सरपंच म्हणाले, कुणाच्या परवानगीने केले लसीकरण; आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण…

१५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण (Covid vaccination) सुरू होते. जवळपास १५ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असताना सरपंच रुपेश मुंदाफळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health workers) मारहाण केली.
Health Workers at Khandala

Health Workers at Khandala

Sarkarnama

नागपूर : नरखेड तालुक्यातील खंडाळा या गावात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड लसीकरण (Covid vaccination) सुरू होते. जवळपास १५ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले असताना सरपंच रुपेश मुंदाफळे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना (Health workers) मारहाण केली. तत्पूर्वी मुंदाफळे यांनी आरोग्य अधिकारी किशोर ढोबळे यांना फोनवर अश्लील शिवीगाळ केली. सरपंच मुंदाफळेंच्या या कृत्याची ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सोशल मिडीयावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

काल 4 जानेवारी रोजी नरखेड तालुक्यातील खंडाळा गावात 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाची टीम गेली होती. जवळपास 15 लाभार्थींना लसीकरण झाले असताना अचानक खंडाळा गावाचे सरपंच रुपेश मुंदाफळे यांनी कुणाच्या परमिशनने लसीकरण घेताय या कारणावरून आधी शिवीगाळ केली. नंतर प्राथमिक आरोग्य केंद्र भिष्णूरचे आरोग्य साहाय्यक प्रवीण धोटे, कोविड लसीकरण वाहनाच्या चालकाला मारहाण केली. याशिवाय आरोग्य सेविका श्रीमती गजबे यांना अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ केली. याबाबत डॉक्टर किशोर ढोबळे यांनी सरपंच मुंदाफळे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनासुद्धा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ व दमदाटी केली.

सरपंच मुंदाफळे यांच्या कृत्याची माहिती नरखेडचे तहसीलदार, पंचायत समिती गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना देण्यात आली आणि नरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सरपंचाने आरोग्य कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. या प्रकारानंतर लसीकरणाची प्रक्रिया बंद पडली. मुंदाफळेला पोलिसांना लगेच अटक केली. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलिसांनी मुंदाफळेला पोलिस कोठडीची मागणी केली आहे. वृत्त लिहीपर्यंत न्यायालयाचे कामकाज सुरू होते.

<div class="paragraphs"><p>Health Workers at Khandala</p></div>
लसीकरण वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी मनीषा खत्री थेट बांधावर!

लसीकरण बंद..

काल खंडाळ्यात झालेल्या प्रकारानंतर आज आरोग्य कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले. नरखेड तालुक्यासह जिल्हाभर लसीकरण बंद असल्याची माहिती आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंदचे शस्त्र उगारल्यानंतर संपूर्ण जिल्हा प्रभावित झाला आहे. आज जिल्हा पोलिस अधीक्षक विजय मगर यांनी भेट दिली. त्यानंतर तणावाची स्थिती निवळली. राजकारणाच्या बदलत्या काळात लोकप्रतिनिधी आपल्या पदाचे भान विसरत असल्याचे वास्तव समोर येत आहे. परवा परवा भंडारा जिल्ह्यातील मोहाडी-तुमसरचे आमदार राजू कारेमोरे यांनी पोलिस ठाण्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करीत असाच धिंगाणा घातला होता. त्यानंतर काल सरपंचाने कर्मचाऱ्यांना मारहाण केली. जनमानसातून अशा कृत्याचा निषेध करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com