राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बंडखोरी; आघाडीला मोठा धक्का...

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते सतीश शिंदे यांच्या पत्नी अंजली शिंदे Wife of NCP Leader Satish Shinde Anjali Shinde यांनी सावरगावमध्ये बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार देवकाबाई बोडखे Devakabai Bodkhe यांच्याशी होणार आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बंडखोरी; आघाडीला मोठा धक्का...
Mahavikas AghadiSarkarnama

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकांमध्ये सामंजस्याने उमेदवार देण्याचे आघाडीतील पक्षांनी ठरवले होते. त्यामुळे बंडखोरी होणार नाही, असे बोलले जात होते. पण जिल्ह्यातील नरखेड आणि रामटेक तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांनी बंडखोरी केली. हा आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतून माघार घेण्यासाठी नरखेड तालुक्यातील सावरगाव सर्कलच्या अंजली शिंदे आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातील बोथिया-पालोरा सर्कलमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नकुल बरबटे यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते सतीश शिंदे यांच्या पत्नी अंजली शिंदे यांनी सावरगावमध्ये बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांचा सामना राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवार देवकाबाई बोडखे यांच्याशी होणार आहे. याशिवाय पार्वताबाई काळबांडे भाजप आणि ललिता खोडे या शिवसेनेच्या उमेदवारही रिंगणात आहेत.

शिंदे यांनी माघार घ्यावी यासाठी दिवसभर प्रयत्न सुरू होते. प्राप्त माहितीनुसार सतीश शिंदे यांच्याशी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मुंबईतून संपर्क साधला. त्यांना महामंडळ देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मध्यंतरी त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत बोलावून घेतले होते. राष्ट्रवादीचे स्थानिक नेते कुठलाही निर्णय घेताना विश्वासात घेत नसल्याने शिंदे यांनी कुठल्याही परिस्थिती निवडणूक जिंकून दाखवण्याचे आव्हान स्वीकारल्याचे कळते.

Mahavikas Aghadi
जगतापांची बाजार समिती, पाटलांची आमदारकी घालविणाऱ्या बंडगरांची बंडखोरी पुन्हा चर्चेत 

रामटेकमध्ये राजीनाम्याची धमकी

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना बोथिया- पालोरा जिल्हा परिषद सर्कलमध्ये राष्ट्रवादीच्या नकुल बरबटे यांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यांना राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवारीसुद्धा दिली होती. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात आला होता. दगाफटका होऊ नये याकरिता राष्ट्रवादीची उमेदवारी दबावतंत्राचा भाग होता. मात्र, वरून दबाव आल्याने सोमवारी दिवसभर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी माघारीसाठी प्रयत्न केले. मात्र उमेदवार बरबटे यांनी फोन बंद करून ठेवला होता. ते उमेदवारी मागे घेण्याची वेळ संपल्यावरच समोर आले. विशेष म्हणजे बरबटे यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यास दबाव टाकल्यास रामटेक तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याची धमकी दिल्याचे कळते.

शिंदे आणि बरबटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. रामटेकचा उमेदवार दिवसभर आउट ऑफ कव्हरेज होता. त्याच्या घरीसुद्धा आपण जाऊन आलो. रामटेक राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे आमचा नाइलाज झाला. शिंदे यांचीही समजूत काढण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र त्यांनी आधीच निवडणूक लढण्याचा निर्धार केला होता.

- बाबा गुजर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.