मला जिवे मारण्याचा राणा दाम्पत्याच्या कार्यकर्त्यांचा कट होता !

मला जिवानिशी मारण्याचा हा कट होता, असे म्हणत गुडधे समर्थक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्य (MP Navnit Rana and MLA Ravi Rana)आणि शिवसेनेतील वाद आता विकोपाला गेला आहे.
Rana's parti workers attacked on Shivsena Bhavan
Rana's parti workers attacked on Shivsena BhavanSarkarnama

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) आणि आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिल्यानंतर शहरात शिवसैनिक आणि राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये युद्ध सुरू झाल्यासारखी स्थिती आहे. दरम्यान काल राणांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनावर हल्ला केल्याचा आरोप महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी केला आहे.

शिवसेना कार्यालयात कुणी नसताना राणा समर्थक आत शिरले आणि त्यांनी खुर्च्यांची तोडफोड केली. पेट्रोलच्या बॉटल्ससुद्धा त्यांनी सोबत आणल्या होत्या. मला जिवानिशी मारण्याच्यासुद्धा धमक्या येत आहेत. त्यामुळे मला मारण्याचा हा कट होता, असा आरोप पराग गुडधे यांनी केला आहे. शिवसेना भवनावर हल्ला केल्यानंतर आता शिवसैनिक शांत बसणार नाही, असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यामुळे आता हा वाद अधिक पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौघांना अटक..

शिवसेना कार्यालयावरील हल्ला प्रकरणी राणांच्या ४ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मला जिवानिशी मारण्याचा हा कट होता, असे म्हणत गुडधे समर्थक आक्रमक झाले आहेत. राणा दाम्पत्य आणि शिवसेनेतील वाद आता विकोपाला गेला आहे. त्यातच राणांच्या मुंबईच्या खार येथील निवासस्थानावर अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महानगरपालिका कारवाई करणार असल्याच्या वृत्ताने राणा समर्थक खवळले असून त्याचे पडसाद अमरावती शहरात उमटू लागले आहेत.

Rana's parti workers attacked on Shivsena Bhavan
प्रकृती अत्यवस्थ असल्याने नवनीत राणा तुरुंगातून थेट लीलावती रुग्णालयात

राणा यांच्या घराच्या मंजूर आराखड्या व्यतिरिक्त अधिकचं बांधकाम झाल्याचे तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याची तक्रार महापालिकेला प्राप्त झाली आहे. त्यानुसार पालिकेचे अधिकारी याबाबतची पाहणी करणार आहेत. पालिकेच्या खार वार्ड कार्यालयाच्या अधिकाऱ्यांकडून ही पाहणी होणार आहे. खार येथील १४ वा रस्ता येथील इमारतीत राणा दांपत्याचे घर असून पालिकेने या इमारतीवर नोटीस बजावली आहे. प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली खार पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. दोघांविरोधात पोलिसांनी राजद्रोह, राज्य सरकारविरोधात प्रक्षोभक विधान करणे आणि सरकारला आव्हान देणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in