राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणाला पोलिस आयुक्तांनी परवानगी दिली, पण...

गेल्या महिन्याभरापासून हनुमान चालिसा पठणावर आमदार रवी राणा, (MLA Ravi Rana) खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) विरुद्ध शिवसेना असा संघर्ष चांगलाच शिगेला पोहोचला आहे.
राणा दाम्पत्याच्या हनुमान चालिसा पठणाला पोलिस आयुक्तांनी परवानगी दिली, पण...
MLA Ravi Rana and MP Navnit RanaSarkarnama

नागपूर : हनुमान चालिसा पठण आणि भोंगे, या दोन विषयांनी राज्यभर वातावरण गरम केलेले आहे आणि आज आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navnit Rana) शहरातील राम नगरमधील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. याला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी परवानगी दिली. पण त्यासाठी कडक अटी व शर्थी घालून दिल्या आहेत.

हनुमान मंदिरात चालिसा पठणासाठी दुपारी दीड वाजता राणा दांपत्य नागपुरात (Nagpur) दाखल होत आहे. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारची रॅली आणि भोंग्याचा वापर करण्यास शहर पोलिसांनी निर्बंध घातले आहे. विशेष म्हणजे मंदिरात निवडक लोकांसोबतच चालिसा पठणाची परवानगी दिली असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

गेल्या महिन्याभरापासून हनुमान चालिसा पठणावर आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा विरुद्ध शिवसेना असा संघर्ष चांगलाच शिगेला पोहोचला आहे. यातून राणा दांपत्य ठिकठिकाणी हनुमान चालिसा पठणाचे कार्यक्रम घेत आहे. त्यातून त्यांनी शनिवारी रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी पोलिस आयुक्तांकडे परवानगी मागितली. त्यांना पोलिस आयुक्तांकडून पठणासाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कुणालाही भोंग्याचा वापर त्यांना करता येणार नाही. मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी परवानगीची गरज नाही, याशिवाय बाहेर कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना देण्यात आली आहे.

MLA Ravi Rana and MP Navnit Rana
आमदार म्हणतात, नागपूर कराराचा भंग नको; विदर्भावरील अन्याय थांबवा..

विशेष म्हणजे राणा दाम्पत्याने विमानतळ ते मंदिरापर्यंत रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, ती परवानगी पोलिस आयुक्तांनी नाकारली आहे. दरम्यान सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षातर्फे हनुमान चालिसा पठण करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. त्यांनाही याच अटींवर परवानगी दिली असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली. यासाठी दोन्ही पक्षांमधील कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करणार नाही, याबाबत काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अगोदर दुपारी १२ वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी हनुमान चालिसा पठण करतील, त्यानंतर राणा दाम्पत्याला परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अटी शर्थीचे उल्लंघन झाल्यास कारवाई..

पोलिसांनी दोन्ही पक्षांना हनुमान चालिसा पठणासाठी बऱ्याच अटी, शर्थी टाकल्या आहेत. यामध्ये मंदिरासमोर कार्यकर्त्यांची गर्दी न करणे, मंदिरात निवडकांचा चालिसा पठणासाठी समावेश, कोणतेही प्रक्षोभक वक्तव्य न करणे आदींचा समावेश आहे. या अटींचे पालन झाल्यास पोलिस आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in