तुरुंगातून सुटून पहिल्यांदाच अमरावतीत परतलेल्या राणा दांपत्याचा दुग्धाभिषेक

Ravi Rana| Navneet Rana| २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली होती.
Ravi Rana| Navneet Rana
Ravi Rana| Navneet RanaSarkarnama

अमरावती : नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) तब्बल दिड महिन्यांच्या कालावधीनंतर विदर्भात दाखल झाले. अमरावतीत आगमन होताच राणा दाम्पत्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. याशिवाय ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले. (Navneet Rana and Ravi Rana news)

राणा दांपत्य त्यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवासस्थानी पोहचल्यानंतर रात्री राणा दांपत्याचा दुग्धभिषेक सोहळा पार पडला. नवनीत राणा आणि रवी राणा दोघांना सोबत बसवून दुग्धभिषेक करण्यात आला. नागरिकांच्या समस्या सोडविताना एक नवा संकल्प करून पुढील वाटचाल करणार असल्याचं सांगत राणा दाम्पत्याने सांगितले.

Ravi Rana| Navneet Rana
राणा दाम्पत्य बाहेर येणार पण तीन अटींचं पालन करावं लागणार; अन्यथा जामीन रद्द होणार!

दरम्यान, गेल्या महिन्यात राणा दांपत्याने ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिल्यानंतर मोठा गदारोळ सुरू झाला होता. खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी काल मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. बाहेर शिवसैनिक हे राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण बनत चालेले होते.

अखेर खार पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना खार पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना अटक केली. राणा दांपत्यावर दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ अ लावण्यात आलं आहे. हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. यामुळं राणा दांत्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय होईल.

चौदा दिवसांनंतर न्यायालयाने दोघांनाही पन्नास हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन दिला. त्यांना २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयात त्यावर अखेरचा युक्तीवाद ३० एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवस त्यावरील निकाल लांबला. अखेर बुधवारी सकाळी न्यायालयाने निकालाचे वाचन केले. दोघांनाही जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com