Aditya Thackeray : नागपुरातील समस्या उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे…

पाहणी करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त लोकांची थेट भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज नांदगावमध्ये आले होते.
AdityaThackeray and Devendra Fadanvis
AdityaThackeray and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : ऊर्जा प्रकल्पांमधून निघणाऱ्या राखेमुळे लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी होते आहे. पण त्यासाठी कुणीच कसं काही करत नाही, हे बघून मलाच आता लाच वाटायला लागली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे ऊर्जामंत्रीसुद्धा आहेत. आता ही राखेची समस्या त्यांना मी सांगणार आहे, असे शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.

नागपूर (Nagpur) जिल्ह्याच्या पारशिवणी तालुक्यातील नांदगाव येथे राखेच्या बंधाऱ्यातून शेतांमध्ये राख सोडली जात आहे. त्याची पाहणी करण्यासाठी आणि नुकसानग्रस्त लोकांची थेट भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आज नांदगावमध्ये आले होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, मला माहिती नव्हते की, येथे येवढी मोठी समस्या आहे. येथे वीज निर्मिती होते. पण त्यासाठी लोकांचे किती मोठे नुकसान होते आहे, हे येथे आल्यावरच बघायला मिळाले. मी येथे आलो तेव्हा राख बघायला मिळत होती. पिण्याच्या पाण्यातही राख होती.

AdityaThackeray and Devendra Fadanvis
'त्या वेळची इच्छा आदित्य ठाकरे आता पूर्ण करत आहेत; देव त्यांचे भले करो'

मी पर्यावरण मंत्री असताना राखेचे डंपिंग बंद केले होते. आता हे सरकार काय करेल हे मला माहिती नाही. मात्र मी या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करेल, मी तुमच्या सोबत आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. जोपर्यंत राखेच्या समस्येपासून तुमची सुटका होत नाही, तोपर्यंत आपण इकडे लक्ष ठेऊन राहू. राखेचे डंपिंग बंद करायला सरकारला भाग पाडू. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून यासाठी लढा देऊ, असे आमदार आदित्य ठाकरे यांनी नांदगावच्या लोकांना सांगितले.

बीड मध्येसुद्धा असाच प्रश्न आहे तिथले लोक माझ्याकडे येत आहेत. नांदगावचे लोकसुद्धा येथील फोटो माझ्याकडे पाठवीत होते. त्यावरून मला येथील भीषण परिस्थितीचा अंदाज आला होता. पण प्रत्यक्ष बघितल्यावर स्थिती त्यापेक्षाही भयावह आहे. राखेमुळे लोकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली आहे. मी पर्यावरण मंत्री असताना यासंबंधातील अनेक प्रश्‍न सोडविले होते. आताही याचा पाठपुरावा करणार आहे.

ऊर्जा प्रकल्पातून निघालेली ही राख लोकांचे जीवन खराब करीत आहे. पण हीच राख सोनं सुद्धा होऊ शकते. त्यावर अद्याप कुणी काम केलेले नाही. राखेमुळे येवढे मोठे नुकसान होत असताना कुणीच कसं काही करत नाही. याचे आश्‍चर्य वाटते. उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्री सुद्धा आहेत, त्यांना भेटून मी या समस्या त्यांना सांगणार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in