Abdul Sattarr : कवी विद्रोही म्हणतात, पद का घमंड धन का खुमार है; क्या करे वह सत्तार है…

आता कवींनीही सत्तारांचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे नेते शब्बीर अहमद विद्रोही यांनी कवितेतून अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची खरडपट्टी काढली आहे.
Shabbir Vidrohi, Supriya Sule and Abdul Sattar
Shabbir Vidrohi, Supriya Sule and Abdul SattarSarkarnama

नागपूर : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राज्यभर संतापाची लाट आहे. सत्तारांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे समाधान झालेले नाही. सत्तारांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कार्यकर्ते ठाम आहेत. ही टीका सत्तारांना चांगलीच महागात पडल्याचे दिसत आहे.

नागपूर (Nagpur) शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने (NCP) आज होम हवन करण्यात आले. सत्तारांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी हे आंदोलन होते. अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना उद्देशून अपशब्द वापरल्याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. नागपुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सत्तार यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला.

कालपासून राज्यातील वातावरण तापले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी काल सत्तारांच्या घराबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे, तर काही आक्रमक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाच्या काचाही फोडल्या. सत्तारांच्या वक्तव्यावरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. आता कवींनीही सत्तारांचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक आघाडीचे नेते शब्बीर अहमद विद्रोही यांनी कवितेतून अब्दुल सत्तार यांची खरडपट्टी काढली आहे. विद्रोही म्हणतात...

सत्तार बुद्धि से बेकार...

न सत्य है न सत्य का सार है

कुपित बुद्धि में कुपित विचार है

पद का घमंड धन का खुमार है

क्या करे वह आदत से लाचार है

जानते हैं सभी उसकी फितरत

मानता है हर कोई कि वह गद्दार है

सम्मान दे कैसे पास जब है ही नही

भरा हुआ जब उसके मन मे अहंकार है

फोटो पर मार रहे थे जब लोग चप्पल

चप्पल चिल्ला रही कि मुझ पर अत्याचार है

सभ्यता की उम्मीद उससे करना व्यर्थ

दिमाग़ में है गंदगी मुंह बदबूदार है

दलदल का वासी दल बदल मे माहिर

ऐसे के मुंह लगना विद्रोही बेकार है

Shabbir Vidrohi, Supriya Sule and Abdul Sattar
Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या विरोधात पुसदमध्ये तक्रार दाखल !

दुसऱ्या कवितेत कवी विद्रोही म्हणतात...

सत्तार का अर्थ मुहाफिज,(रक्षक )

रक्षक जब भक्षक बन जाए

मानवता को बेच के खाए

सामाजिकता में आग लगाए

सभ्यता की दीवार गिराए

मानव से मानव को लड़ाए

उसको भला कौन समझाए

‘विद्रोही’ का है यही सुझाव

बढने मत दो कोई तनाव

अपने बुरे सब काम बदल दो

नही तो अपना नाम बदल दो

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in