Navneet Rana News: खासदार राणा यांना धमकी देणाऱ्यास अटक, पण फोन करण्याचे कारण गुलदस्त्यात !

Amravati Police : पथकाने मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथून अटक केली.
Navnit Rana
Navnit RanaSarkarnama

Amravati Political Crime News : खासदार नवनीत राणा यांना फोन करून धमकी देणाऱ्या संशयितास गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथून अटक केली. श्याम विठ्ठल तायवाडे (वय ३५, रा. नेरपिंगळाई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. (The police had registered a case against an unknown person)

गुन्हेशाखेच्या पोलिसांनी संशयित श्याम तायवाडे याला मंगळवारी (ता. २२) रात्री उशिरा अटक करून अमरावतीत आणले. युवा स्वाभिमानी पक्षाचे पदाधिकारी विनोद गुहे (रा. शंकरनगर) यांनी खासदार राणा यांच्या वैयक्तिक मोबाईलवर अनोळखी व्यक्तीने फोन करून अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार राजापेठ पोलिसांत नोंदवली होती. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

तपासासाठी गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, युनिट एकचे निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलिस निरीक्षक सायबरचे अनिकेत कासार, उपनिरीक्षक राजकिरण येवले, साहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र काळे, जावेद अहेमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने यांचे पथक नेरपिंगळाई येथे जाऊन संशयित श्याम तायडे यास अटक केली.

अटक केलेल्या श्याम तायडे यास साहाय्यक पोलिस आयुक्तांसमोर हजर केल्या जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. चौकशी दरम्यान ज्या फोनवरून धमकी दिली तो मोबाईल फोन सिमकार्डसह जप्त करण्यात आला. त्याने अनेक अधिकाऱ्यांना असे फोन लावल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. फोन करण्याचे कारण समजू शकले नाही. तपास सुरू आहे, असे राजापेठ पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर यांनी सांगितले.

Navnit Rana
Amravati Loksabha : कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना नाही चालणार बाहेरचा उमेदवार, निरीक्षकांना स्पष्टच सांगितले !

गेल्‍या पाच ते सहा दिवसांपासून नवनीत राणा यांच्‍या मोबाईलवर विठ्ठलराव नावाची व्‍यक्‍ती चाकूने वार करून ठार करू, अशी धमकी देत होती. गर्दीच्‍या ठिकाणी मी कधीही धारदार चाकूने वार करणार, ते माहितीही पडणार नाही, अशा शब्‍दांमध्‍ये धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने अश्‍लील शिवीगाळदेखील केल्‍याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

राजापेठ पोलिसांनी (Police) आरोपीच्‍या विरोधात भादंवि ५०४, ५०६ (ब) कलमान्‍वये गुन्‍हा काल (ता. २२) दाखल केला होता. गेल्‍या वर्षीदेखील हनुमान चालिसा पठण केल्‍यास तुम्‍हाला ठार मारू, अशी धमकी नवनीत राणा (Navnit Rana) यांना देण्‍यात आली होती. या प्रकरणी खासदार नवनीत राणांनी नवी दिल्‍ली (Delhi) येथील नॉर्थ अव्‍हेन्‍यू पोलीस ठाण्‍यात तक्रार दाखल केली होती. आता धमकीचा नवीन प्रकार समोर आला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in