J.P. Nadda : हिंदुहृदयसम्राटांचा मुलगा तेव्हा काय करत होता? त्यांना जनतेने माफ करू नये...

Shivsena : देशात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र, ही घोषणा दिली गेली होती. तेव्हा मंचावर शिवसेनेचे लोकसुद्धा होते.
J.P. Nadda and Uddhav Thackeray
J.P. Nadda and Uddhav ThackeraySarkarnama

BJP National President J. P. Nadda News : सन २०१९च्या निवडणुकीचा तो काळ होता. तेव्हा देशात नरेंद्र (Narendra Modi) अन् राज्यात देवेंद्र, ही घोषणा दिली गेली होती. तेव्हा मंचावर शिवसेनेचे लोकसुद्धा होते. पण तेव्हा ते काहीच बोलले नाहीत आणि निकाल लागल्यावर मग त्यांना मुख्यमंत्रिपदाचे डोहाळे लागले. आम्ही नाही, तर त्यांनीच आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) म्हणाले.

आज चंद्रपुरात (Chandrapur) त्यांची सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, केव्हाही पाणी वरून खाली येते. नेहमी सत्याकडे जनता येत असते. अनैतिक आघाडी टिकत नाही. त्यांनी विचारधारेशी कॉंप्रमाईज केले, संस्कृतीशी बेईमानी केली, जनतेच्या भावना दुखावून ते भिन्न विचारधारेच्या लोकांसोबत गेले. त्यांना त्याचे उत्तर मिळाले. अनैतिकतेने बसवलेले सरकार गेले. त्यानंतर आलेले शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) सरकार राज्याला विकासाच्या वाटेवर नेत आहे. पालघरमध्ये साधूंसोबत काय झाले, हे देशाला ठाऊक आहे. हिंदूहृदयसम्राटचा मुलगा तेव्हा काय करत होता, तर भिन्न विचारधारेच्या लोकांसोबत मांडीला मांडी लाऊन बसला होता, अशी जळजळीत टिकाही त्यांनी केली.

आघाडीच्या पिछाडी सरकारमध्ये तीन दुकाने होती. आधी उद्धव ठाकरे मग कॉंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस. प्रत्येकाला कामासाठी तीन दुकानांमध्ये जावे लागत होते. या प्रकाराला लोक कंटाळले आणि मग केला उठाव. तो महाराष्ट्रातील ऐतिहासिक उठाव होता. राजकारणातही पारदर्शकता असायला हवी, पण त्यांच्या सरकारमध्ये ती नव्हती. म्हणून त्यांच्यावर आज वणवण भटकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंसारख्यांना लोकांना माफ करू नये, असे जे.पी. नड्डा म्हणाले.

J.P. Nadda and Uddhav Thackeray
नड्डा, शहांचा आदेश डावलला; भाजपच्या पाच नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

डीबीटीचा अर्थच त्या लोकांना उलटा घेतला होता. डी म्हणजे डिलरशीप, बी म्हणजे ब्रोकेज आणि टी म्हणजे ट्रान्सफर. यातून मोठा भ्रष्टाचार केला. आत्ता कुठे त्यांच्या काळातील एक मंत्री जेलमधून सुटला. दुसरा अजूनही जेलमध्ये आहे. पण अजूनही त्यांनी धडा घेतलेला दिसत नाही. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून भ्रष्टाचार कमी झाला आणि विकासाचा वेग वाढला, असे नड्डा यांनी सांगितले. सुधीर मुनगंटीवार म्हणाले काश्‍मीर ते कन्याकुमारी आणि कच्छपर्यंत भाजपला विजयी करायचे आहे. आता पूर्ण ताकद लावायची आहे. त्यामुळे या विजयी संकल्प यात्रेची सुरुवात चंद्रपुरातून केली, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com