Nagpur : विधानसभाध्यक्षांच्या आदेशाचे पालन होत नाहीये, महापालिकेतून अधिकारी गायब...

नागपुरात (Nagpur) होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी नुकताच घेतला.
Rahul Narvekar at Nagpur
Rahul Narvekar at NagpurSarkarnama

नागपूर : नागपुरात (Nagpur) होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) आणि विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी नुकताच घेतला. शहरातील नागरिकांना अडचणी येणार नाहीत, अशी व्यवस्था करण्याचे आदेश नार्वेकर यांनी दिले होते. पण महानगरपालिकेतून (Municipal Corporation) अधिकारीच गायब राहात असल्याने त्यांच्या आदेशाचे पालन होत नाहीये.

हिवाळी अधिवेशन काही आठवड्यांवर येऊन ठेपले आहे. तरीही याबाबत महापालिका अधिकारी गंभीर नसल्याचे दिसून येत आहेत. मनपा आयुक्त विदेश दौऱ्यावर असल्याने काही अधिकारी अक्षरशः कक्षातून गायब राहत असल्याचं दिसतंय. डिसेंबर महिन्यातील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारी संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी महापालिकेसह सर्व विभागांचा आढावा घेतला. यात त्यांनी महापालिकेला पायाभूत सुविधांबाबत निर्देश दिले. विधानभवन परिसराकडे येणारे सर्व रस्ते, २४ तास पाणीपुरवठा, आपातकालीन सुविधा आदींबाबत महापालिकेला आदेश दिले. परंतु आठवड्याभरात मुख्यालयात एकही अधिकारी जागेवर नसल्याने महापालिकाच ठप्प झाल्याचे दिसत आहे. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. सोमवारपासून स्पेनच्या दौऱ्यावर गेले आहे. केंद्रशासन पुरस्कृत दौऱ्यावरून ते उद्या परतणार असल्याचे समजते.

आयुक्त दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांनी कुणाकडे पदभार सोपविला नाही. परंतु, अतिरिक्त आयुक्त राम जोशी हे वरिष्ठ असल्याने ते सध्या आयुक्तांचा पदभार सांभाळत आहेत. राम जोशी शुक्रवारी महानगरपालिकेत हजर नव्हते. त्यामुळे अधिकारी कर्मचाऱ्यांचे चांगलेच फावले. अधिकारीही दिवसभर पालिका मुख्यालयात दिसले नाहीत. त्यांच्या कक्षात गेले असता ‘साहेब साईट’वर गेल्याचे शिपायांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या मुख्य कामाकडे पाठ फिरविली जात आहे. वित्त व लेखाधिकारी हे दुपारनंतर कार्यालयात दिसत नाहीत. त्यामुळे विविध कामांसाठी महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हाताने घरी परत जावे लागले. आयुक्त आठवडाभर नसल्याने महापालिकेला कुणी वालीच नसल्याचे चित्र होते.

Rahul Narvekar at Nagpur
Rahul Narwekar : माझा नाही पण पदाचा तरी मान राखा - राहुल नार्वेकर

नवे अतिरिक्त आयुक्त येईना..

ऑक्टोबर महिन्यात अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मिना यांची ठाणे येथे आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाली. परंतु, आतापर्यंत दोनदा जिल्हाधिकारीपद भूषविणारे गुल्हाने अतिरिक्त आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारण्यास उत्सुक नसल्याचे सूत्राने सांगितले. त्यामुळे अधिवेशनानिमित्त तयारीचा भार आयुक्त व एका अतिरिक्त आयुक्तांवरच राहणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in