दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन, यासीन भटकळसह इतरांचाही होता मुक्काम...

नागपूर शहर (Nagpur) हे दहशतवाद्यांचा रेस्ट झोन असल्याचे बोलले जाते. दाऊदच्या हस्तकासह इतरही काही दहशतवाद्यांनी (Terrorist) नागपुरात वास्तव्य केलेले आहे.
दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन, यासीन भटकळसह इतरांचाही होता मुक्काम...
Terrorist in NagpurSarkarnama

नागपूर : जैश-ए-मोहम्मद या जहाल दहशतवादी (Terrorist) संघटनेने नागपुरातील संघ मुख्यालयाच्या इमारतीची रेकी (टेहळणी) केल्याचे काल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्यानंतर दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नागपूर शहर (Nagpur City) हे दहशतवाद्यांचा रेस्ट झोन असल्याचे बोलले जाते. दाऊदच्या हस्तकासह इतरही काही दहशतवाद्यांनी नागपुरात वास्तव्य केलेले आहे. त्यामुळे पोलिसांनी (Police) जोमाने तपास सुरू केला आहे.

नागपूर हे दहशतवाद्यांचे रेस्ट झोन असल्याचे बोलले जाते. यापूर्वी अनेक दहशतवादी कारवायांतील दहशतवादी येथे वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, दाऊदचा (Daud) हस्तक व दिल्लीतील बॉम्बस्फोटाचा सूत्रधार अब्दुल करीम टुंडा याने नागपुरात काही दिवस घालवल्याची कबुली दिल्यानंतर दहशतवाद्यांचे नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा उघडकीस आले होते. त्याच्यासह अनेक दहशतवादी नागपुरात वास्तव्यास होते, अशी माहिती वेळोवेळी समोर आली आहे. १९८५ मध्ये दंगल झाली, त्यावेळी आपण नागपुरात होतो, असे टुंडाने दिल्ली पोलिसांना सांगितले होते. टुंडाने त्या काळात एक संघटना स्थापन केली होती. त्यात युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतले होते. मोमीनपुरा भागात या संघटनेतील युवक पथसंचलन करीत होते.

टुंडानंतर दहशतवादी यासीन भटकळ, अखिल खिलजी, अबू फैजल व अब्रार हे दहशतवादीही नागपुरात काही काळ मुक्कामास होते. याचे सबळ पुरावे एटीएसच्या हाती लागले होते. ही पार्श्वभूमी बघता जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी रेकी करणे नवीन नाही. मात्र, कुठलाही धोका होऊ नये, यासाठी पोलिसांनी दीक्षाभूमी, संघ मुख्यालयासह अनेक महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणांवर बंदोबस्त वाढविला आहे. काही महिन्‍यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी नागपूर शहरात रेकी (टेहळणी) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यास अधिकृत दुजोरा दिला आहे. यामुळे खळबळ उडाली असून संघ मुख्यालयासह शहरातील महत्त्वाच्या स्थळांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Terrorist in Nagpur
संसदेवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा ...

संघ मुख्यालय रडारवर ?

सन १९९८ मध्ये संघाची बैठक येथे होती, त्यावेळीही असा प्रकार झाला होता. १९९८ मध्येच ६ डिसेंबरला अशीच रेकी करून संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतरच्या काळात मुख्यालय परिसरात एकदा एन्काऊंटरही झाले होते. संघ मुख्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर राहिले आहे. या परिसरात फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाकडून मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.