खासदार म्हणाले, हा काय तमाशा? महिला चिडल्या अन् मागितला राजीनामा…

महागाई याच्या विरोधात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या महिला मोर्चाने खासदार अशोक नेते MP Ashok Nete यांच्या कार्यालयावर धडकल्या.
MP Ashok Nete Gadchiroli
MP Ashok Nete GadchiroliSarkarnama

चंद्रपूर : लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघातील सर्वांचेच प्रश्‍न समजून घेऊन काम करावे, अशी जनतेची अपेक्षा असते. असेच महिलांच्या प्रश्‍नांसंदर्भात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गडचिरोलीचे खासदार अशोक नेते यांनी कॉल केला होता. तेव्हा ‘तुम्ही हा काय तमाशा करताय’, असे खासदार म्हणाले. त्यामुळे महिला चिडल्या आणि महिलांशी उद्धटपणे बोलणाऱ्या खासदार नेतेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

इंधन दरवाढ आणि त्यामुळे दररोज वाढत असलेली महागाई याच्या विरोधात कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता. या महिला मोर्चाने खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयावर धडकल्या. आपल्या अडचणी सांगत मागण्या मांडत असताना खासदारांनी त्यांनी ‘हा काय तमाशा आहे’, असे म्हटले. त्यावर चिडलेल्या महिलांनी आमचे प्रश्‍न तुम्हाला तमाशा वाटतात काय, जनतेने यासाठी तुम्हाला मते देऊन निवडून दिले का, असे प्रश्‍न करीत आमचे प्रश्‍न सोडवायचे नसतील, तर तुम्ही राजीनामा द्या, असे त्यांना सुनावले. यावेळी महिला प्रचंड आक्रमक झाल्या होत्या.

घेराव करण्यासाठी कार्यालयावर धडकलेल्या महिलांची आक्रमकता बघून खासदार नेते यांनी त्यांचा सामना न करणेच पसंत केले आणि तेथून काढता पाय घेतला. आमच्याशी संवाद साधण्याचे सौजन्य तर खासदार महोदयांनी दाखवायला पाहिजे होते. पण त्यांनी तसे न करता पळ काढला. अशा पळपुट्या खासदाराकडून अपेक्षा तरी काय करायची, असा प्रश्‍न महिलांनी केला. फोनवर बोलताना तारतम्य बाळगले नाही, तर किमान कार्यालयात आलेल्या महिलांशी सभ्यपणे बोलून, त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन फोनवर बोलल्याने चिडलेल्या महिलांची समजूत काढता आली असती. त्यांचे समाधान करता आले असते. पण तसे न करता खासदारांनी पलायन केल्याने महिला अधिकच संतप्त झाल्या.

MP Ashok Nete Gadchiroli
आम्ही मध्यरात्री 1 वाजेपर्यंत वाट पाहत होतो! सर्वोच्च न्यायालयानं भाजप सरकारला सुनावलं

खासदार कधीही मतदारसंघातील गावांत फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना लोकांच्या समस्या दिसत नाही. किमान लोकांनी त्यांच्याकडे मांडलेल्या समस्या सोडविण्याचा तरी त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. पण ते सांगायला गेलेल्या लोकांना ते हुसकावून लावतात. यावेळी तर त्यांनी हद्दच ओलांडली. महिलांचे आणि पर्यायाने समाजातील प्रश्‍न मांडण्यासाठी गेलेल्या मोर्चेकरी महिलांना ‘तमाशा’ म्हणून त्‍यांनी महिलांचा आणि सर्व जनतेचा अपमान केला आहे. त्यांनी या कृत्याबद्दल तात्काळ माफी मागावी आणि जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात अपयशी ठरलो म्हणून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com