पहाटेचा शपधविधी आणि आत्ताच्या बंडाळीत ‘हे’ आहे विदर्भातील आमदारांचे महत्व !

डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingne) आणि आमदार नितीन देशमुख हे दोघेही विदर्भातील आहेत.
Dr. Rajendra Shingna and Nitin Deshmukh.
Dr. Rajendra Shingna and Nitin Deshmukh.Sarkarnama

नागपूर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. या घडामोडींमुळे राजकारणातील काही जुन्या नवीन घटनांना उजाळा मिळत आहे. २०१९ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सर्वात लक्षवेधी ठरला तो पहाटेचा (अजित पवारांच्या मते सकाळचा) शपथविधी आणि आत्ताच्या बंडाळीत अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे आमदार नितीन देशमुख परतले, ही घटना सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे.

८ वाजता सकाळच असते, पण ही घटना गाजली ती पहाटेचा शपथविधी म्हणूनच. २०१९मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं होतं. भाजप-सेनेचे सरकार स्थापन होईल, हे जवळपास निश्‍चित झालं होतं. पण ऐन वेळी अशा काही घडामोडी झाल्या की, सामान्य नागरिकांसह राजकीय जाणकारही बुचकळ्यात पडले होते. शिवसेनेने (Shivsena) भाजपसोबत जाण्यास नकार दिला आणि कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत (NCP) सरकार स्थापन करणार असल्याचे सुतोवाच केले. शिवसेनेच्या या टर्नमुळे भाजपला मोठा धक्का बसला. या सर्व घडामोडी सुरू असताना भाजपनेही आपली व्यवस्था करून ठेवली होती आणि पहाटे राज्यासह देशाला मोठा धक्का दिला.

२३ नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी सर्व न्यूज चॅनलवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार शपथ घेताना दिसले. राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीने देशभरात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर लगेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ॲक्टीव्ह झाले आणि त्यांनी आपल्या आमदारांचे बंड मोडून काढले. ते सरकार औटघटकेचे ठरले. केवळ अडीच दिवसांत ते सरकार कोसळले आणि फडणवीसांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. हा भाजपसाठी त्यातल्या त्यात फडणवीसांना मोठा धक्का होता. ती सल आजही त्यांच्या मनात कायम असल्याचे दिसते.

त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडी करून सरकार स्थापन केले आणि मुख्यमंत्रिपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे विराजमान झाले. तेव्हापासून फडणवीसांनी हे सरकार पाडण्याचा चंग बांधला आणि त्यादृष्टीने खेळी करण्यास सुरुवात केली. थोडेथोडके नाही तर तब्बल अडीच वर्षांनंतर फडणवीसांच्या खेळीला यश येताना दिसत आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते भाजपसोबत जाणार, हे जवळपास निश्‍चित मानले जात आहे. देशभर खळबळ उडवून देणाऱ्या या दोन्ही घटनांमघ्ये विदर्भाच्या आमदारांची भूमिका महत्वाची राहिली आहे.

Dr. Rajendra Shingna and Nitin Deshmukh.
Nitin Deshmukh : पोलिसांनी मला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले; नितीन देशमुख

पहाटेचा शपथविधीच्या एपिसोडनंतर विदर्भाच्या बुलडाणा जिल्ह्यातील आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingne) आपबिती कथन केली होती. पडद्यामागे काय काय घडामोडी झाल्या, याची सविस्तर माहिती त्यांनी तेव्हा दिली होती. तर यावेळी शिंदे गटाच्या तावडीतून आपण कसे सुटलो, याची आपबिती आमदार नितीन देशमुख यांनी माध्यमांसमोर कथन केली. देशमुखसुद्धा विदर्भाच्या अकोला जिल्ह्यातील आमदार आहेत. आपल्याला कसे फसवून नेण्यात आले, हे आमदार शिंगणे यांनी तेव्हा आणि आमदार देशमुख यांनी आता सांगितले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विदर्भ नेहमी अधोरेखित होत आला आहे. यावेळी असे घडल्याचे बघायला मिळाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com