MLA Agrawal: आमदाराने आधी केली मारहाण, प्रकरण अंगलट आल्यावर मागितली माफी..

संतप्त कर्मचारी तक्रारीसाठी रामनगर पोलिस स्टेशनला गेल्याने प्रकरण आपल्या अंगलट येत आहे, हे बघून आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) यांनी पाऊल मागे घेत संबंधित कर्मचाऱ्याची माफी मागितल्याने
MLA Vinod Agrawal, Gondia.
MLA Vinod Agrawal, Gondia.Sarkarnama

भंडारा : थकित वीज बिलाची सक्तीने वसुली का करता, असा जाब विचारायला गेलेले गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी उपकार्यकारी अभियंत्याला मारहाण केली. त्यानंतर प्रकरण अंगावर शेकणार, असे लक्षात येताच आमदारांनी माघार घेत माफी मागून सुटका करवून घेतली.

गोंदियात (Gondia) आज आमदार- कर्मचारी वाद चांगलाच रंगल्याचे पहायला मिळाले. थकित वीज बिलाची सक्तीने वसुली का करता, असा जाब विचारायला गेलेले गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल (Vinod Agrawal)यांनी महावितरणाच्या उपकार्यकारी अभियंताला मारहाण केल्याची घटना गोंदियात घडली. संतप्त कर्मचारी तक्रारीसाठी रामनगर पोलिस (Police) स्टेशनला गेल्याने प्रकरण आपल्या अंगलट येत आहे, हे बघून आमदार विनोद अग्रवाल यांनी पाऊल मागे घेत संबंधित कर्मचाऱ्याची माफी मागितल्याने प्रकरण तूर्तास तरी मिटले आहे.

मुर्री येथील लारोकर नामक ग्राहकाचे थकित विजेचे बिल असल्याने महावितरणाचे अधिकारी लारोकर यांचा घरी वसुली साठी धडकले होते. दरम्यान लारोकर यांनी आमदार विनोद अग्रवाल यांना मदत मागितली. मतदार संघातील मतदाराला खूश करण्याच्या नादात आमदार महोदय यांनी सूर्याटोला येथील पॉवर हाउस गाठले आणि उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांना जाब विचारला. दरम्यान आमदार महोदयाचा तोल जात त्यांनी चक्क उपकार्यकारी अभियंता राजेश कंगाले यांना मारहाण केली. शासकीय काम करणाऱ्या आपल्या अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची ही बातमी संपूर्ण कार्यालयात वाऱ्यासारखी पसरली.

MLA Vinod Agrawal, Gondia.
आमदार अग्रवाल म्हणाले, प्रफुल्ल पटेलांमुळेच मी आमदार होऊ शकलो…

कर्मचाऱ्यांनी एकत्र येत आमदार विनोद अग्रवाल यांच्या असभ्य वर्तणुकीचा संताप व्यक्त करत रामनगर पोलिस स्टेशन गाठले. आमदार महोदयाची तक्रार दिली. वाढता दबाब व जमा होत असलेल्या कर्मचाऱ्याचा जमावड़ा लक्षात घेता रामनगर पोलिसांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. ही माहिती आमदार महोदयांना प्राप्त होताच त्यांच्या पायाखालील वाळू सरकली व आपली भविष्यात होणारी फजिती लक्षात घेता स्वतः रामनगर पोलिस स्टेशन गाठत संबंधित मारहाण झालेल्या अभियंत्याची जाहीर माफी मागितली आहे. त्यामुळे संबंधित उपकार्यकारी अभियंत्याने देखील मोठ्या मनाने तक्रार मागे घेतली. याबाबत आमदार महोदयांनी कोणाला मारहाण केली नसल्याचे बोलले खरे, मात्र त्यांनी मागितलेल्या माफीने हे प्रकरण शांत झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in