‘महाविकास’ची चूक शिंदे-फडणवीस सरकारने सुधारली; आता प्रभाग चारचा होणार!

नेमकी तीच चूक महाविकास आघाडी सरकारने केली होती. आता ही चूक सुधारल्यानंतर चार सदस्यांचा प्रभाग होऊ शकतो, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : मुंबई (Mumbai) महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या २३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सदस्य संख्येत सुधारणा होणार आहे. हा निर्णय घेऊन महाविकास आघाडी सरकारने केलेली चूक एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने सुधारली आहे, असे माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) सदस्यसंख्या वाढवली होती. सदस्य संख्या वाढवण्याचा अधिकार सरकारला नाहीये. २०११ मध्ये जी जनगणना झाली होती, त्यानुसारच आता महापालिकांची (Municipal Corporation) सदस्यसंख्या राहणार आहे. महाविकासने ४.५ टक्के लोकसंख्या वाढीव धरून निर्णय घेतला होता. तो निर्णय आज सरकारने मागे घेतला आहे. प्रभागाची रचना बदलविली जाऊ शकते, तो सरकारचा अधिकार आहे. पण सदस्य संख्या वाढविता येत नाही आणि नेमकी तीच चूक महाविकास आघाडी सरकारने केली होती. आता ही चूक सुधारल्यानंतर चार सदस्यांचा प्रभाग होऊ शकतो, असेही आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

कसा आहे शासन निर्णय ?

३ लाखांपेक्षा अधिक व ६ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ६५ इतकी तर कमाल संख्या ८५ इतकी असेल. ३ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १५ हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. ६ लाखांपेक्षा अधिक व १२ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ८५ इतकी तर कमाल संख्या ११५ इतकी असेल. ६ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक २० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल.

Chandrashekhar Bawankule
अपयश लपविण्यासाठी उद्धव ठाकरेंचा भाजपवर आरोप....चंद्रशेखर बावनकुळे

२४ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ५० हजार लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. ३० लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक १ लाख लोकसंख्येसाठी एका अतिरिक्त पालिका सदस्याची तरतूद करण्यात येईल. १२ लाखांपेक्षा अधिक व २४ लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या ११५ इतकी तर कमाल संख्या १५१ इतकी असेल. २४ लाखांपेक्षा अधिक व ३० लाखांपर्यंत लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १५१ इतकी तर कमाल संख्या १६१ इतकी असेल. ३० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या पालिकेत निवडून आलेल्या सदस्यांनी किमान संख्या १६१ इतकी तर कमाल संख्या १७५ इतकी असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in