यवतमाळ येथील ‘त्या’ घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल...

दोषींवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशा भावना वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी Minister Amit Deshmukh व्यक्त केल्या आहेत.
यवतमाळ येथील ‘त्या’ घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी घेतली दखल...
Minister Amit DeshmukhSarkarnama

मुंबई : काल रात्री यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यवतमाळ जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले आहेत.

यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता. रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना अतिशय गंभीर असून याबाबत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, अशा भावनाही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.

नवरात्रोत्सवात १२ ऑक्टोबरच्या रात्री दुहेरी हत्याकांडाची घटना घडली होती. त्याची शाई वाळत नाही, तोच पुन्हा येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील एका डॉक्टराचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने यवतमाळ शहर हादरले आहे. काल रात्री घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरातील नागरिकांसह डॉक्टरांनी धाव घेऊन गंभीर जखमी अवस्थेत डॉक्टर पालला रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयातील परिवीक्षाधीन डॉक्टरांनी आक्रमक पाऊल उचलत डीन साहेब मुर्दाबाद, पोलिस प्रशासन मुर्दाबाद, अशी नारेबाजी करीत रुग्णालय परिसर दणाणून सोडला होता. डॉक्टर पाल यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करीत कठोर शिक्षा द्या, या मागणीसाठी रुग्णालय परिसरात रात्री उशिरापर्यंत परिवीक्षाधीन डॉक्टरांचे ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनाची दखल आज वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून घेण्यात आली.

Minister Amit Deshmukh
अमित देशमुख म्हणतात, पीक विमा कंपन्यांनी निकष बाजूला ठेवून मदत करावी..

डॉक्टर पाल याच्या मृत्यूचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी परिवीक्षाधीन डॉक्टरांनी पोलीस प्रशासन मुर्दाबाद म्हणून नारेबाजी करीत त्यांचा निषेध नोंदवला. मात्र पोलीस प्रशासनाने मारेकऱ्यांची शोधमोहीम सुरू केली आहे. या गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करण्यासाठी एक विशेष टीम कामाला लागली आहे. लवकरात लवकर आरोपींना बेड्या ठोकल्या जातील, असे पोलिसांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.