महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता ‘चुल्लूभर’ पाण्यात बुडून मरावे !

ओबीसीच्या सर्व संघटनांचेही यामध्ये परिश्रम आहेत. त्यांचे आभार मानण्याचा आजचा दिवस आहे, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये (Mahavikas Aghadi Government) तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे (Ajit Pawar) अडीच वर्ष टाइमपास झाला. आता शिंदे - फडणवीस सरकार येताच आम्हाला न्याय मिळाला. आताही ठाकरे सरकार असते, तर बांठिया आयोगाचा अहवाल दाबून ठेवला असता. त्यामुळे आगामी निवडणुकांना आरक्षण मिळाले नसते. असे भाजपचे प्रदेश सरचिटणीस, ओबीसी नेते आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा (OBC Reservation) मार्ग मोकळा केल्यानंतर आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) पत्रकारांशी बोलत होते, ते म्हणाले. शिंदे-फडणवीस सरकार येताच महाराष्ट्रातील (Maharashtra) ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण परत मिळाले. गेले अडीच वर्षे आरक्षण कुणामुळे रखडले, हे आता जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनता सोडणार नाही, त्यांची योग्य जागा दाखवेल. नवीन सरकारने बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारला, तो सर्वोच्च न्यायालयाला टेबल केला. उच्चस्तरीय वकील लाऊन आपली बाजू भक्कमपणे मांडली. त्यामुळेच आजचा दिवस बघायला मिळाला.

महाविकास आघाडी सरकारमध्ये झारीचे शुक्राचार्य होते. १३.१२.२०१९ ला जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात पहिला निकाल दिला. त्यानंतर एक महिन्यातच आरक्षण मिळाले असते. त्यानंतरच्या निकालाचेही पालन केले असते तरी हा विषय रेंगाळला नसता. पण त्या सरकारला ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नव्हते. आजच्या निकालावरून हे सिद्धच झाले आहे. हा दिवस बघण्यासाठी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांनी कष्ट उपसले. ओबीसीच्या सर्व संघटनांचेही यामध्ये परिश्रम आहेत. ओबीसींच्या सर्व संघटनांचे आभार मानण्याचा आजचा दिवस आहे, असे आमदार बावनकुळे म्हणाले.

Chandrashekhar Bawankule
बावनकुळे म्हणाले, महाजनकोकडून लवकरात लवकर मदत मिळवून देऊ...

उद्धव ठाकरे सरकार असतं तर ओबीसी समाज ही लढाई जिंकू शकला नसता. ओबीसी समाजाला जर कुणी न्याय मिळवून देईल, तर ते देवेंद्र फडणवीसच देतील, असे आम्ही वारंवार सांगत होतो. आज त्यांनी आमचे म्हणणे खरे ठरवले, याचा सार्थ अभिमान आहे. आजचा दिवस बघण्यासाठी फडणवीस यांच्यासह आमचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी संघर्ष केला. ओबीसी संघटनांचाही यामध्ये मोठा वाटा आहे. आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ‘चुल्लूभर’ पाण्यात बुडून मेले पाहिजे, अशी घणाघाती टिका आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in