शेतकरी संघटनेचा नेता कॉंग्रेसच्या कार्यक्रमात, नव्या राजकीय गणिताचे संकेत...

राजूरा Rajura विधानसभा क्षेत्रात एक टर्म सोडली, तर भाजपला BJP म्हणावे तसे यश मिळाले नाही. कॉंग्रेस Congress व शेतकरी संघटनेचेच या क्षेत्रात वर्चस्व राहिले आहे.
Program at gondpipri Dist Chandrapur.
Program at gondpipri Dist Chandrapur.Sarkarnama

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : सध्या बऱ्याच पक्षांतील लोकांना सत्तापक्षाचे वेध लागले आहे. राज्यस्तरावर हे नेहमीच बघायला मिळते. आता जिल्हा आणि तालुकास्तरावरील नेत्यांनाही सत्तापक्षाचे आकर्षण वाटू लागले आहे. कॉंग्रेसच्या एका कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या नेत्याने हजेरी लावली. त्याची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि नव्या राजकीय गणिताचे संकेतही या नेत्याने दिले आहे.

ग्रामीण भागातील राजकारण म्हटलं की, लईच भारी आपला नेता आपला पक्ष किती चांगला अन् लोकहितकारी काम करणारा आहे, हे सांगण्यासाठी कार्यकर्ते आटापिटा करतात. कट्ट्यावर आपल्याच पक्षाचे गुणगान गातात. अलीकडे तर सोशल मिडीयातून एकमेकांच्या पक्षाची खिल्ली उडविणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जातात. विरोधी पक्षाचा कार्यक्रम असला की दुसऱ्या पक्षाचे कार्यकर्ते तिकडे भटकतही नाहीत. पण गोंडपिपरीत नुकत्याच पार पडलेल्या कॉंग्रेसच्या कार्यक्रमात शेतकरी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगायला लागली. निमित्त होते राजूरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या वाढदिवसाचे.

राजूरा विधानसभा क्षेत्रात एक टर्म सोडली, तर भाजपला म्हणावे तसे यश मिळाले नाही. कॉंग्रेस व शेतकरी संघटनेचेच या क्षेत्रात वर्चस्व राहिले आहे. या पक्षांचे गावागावांत कार्यकर्ते आहेत. करंजी येथील तुकेश वानोडे हे गेल्या पस्तीस वर्षांपासून शेतकरी संघटनेत काम करीत आले आहेत. माजी आमदार वामनराव चटप यांचे ते अगदी जवळचे मानले जातात. पण त्यांना आता सत्तापक्षाचे वेध लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामुळेच ते गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते व बाजार समितीचे उपसभापती अशोक रेचनकर यांच्या संपर्कात आहेत. चक्क कॉंग्रेसच्याच कार्यक्रमात हजेरी लावीत त्यांनी नव्या राजकीय गणिताचे संकेत दिले आहेत.

दुसरीकडे त्यांना पक्षात घेण्यावरून कॉंग्रेसमध्ये दोन गट असल्याची चर्चा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ता स्थापन केल्यापासून सभापती व उपसभापती पदावरून दरम्यानच्या काळात गटबाजी झाल्याचे समोर आले होते. आता वानोडेंच्या निमित्ताने पुन्हा ती एकदा समोर येण्याची चिन्हे आहेत. कॉंग्रेस माजी तालुकाध्यक्ष राजीवसिह चंदेल यांचे बंधू रंजू चंदेल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला. त्यांच्या प्रवेशानंतर आता राजीव चंदेल ही वेगळी भूमिका घेतील अशी चर्चा आहे. येत्या काळात नगरपंचायत निवडणुकांसह जि.प. व पंचायत समिती निवडणुका होऊ घातल्या आहेत. अशावेळी आत्तापासून कार्यकर्त्यांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.

Program at gondpipri Dist Chandrapur.
काॅंग्रेस म्हणजे बीएसएनएलचे टाॅवर, कोणी कुठेही गेले तरी तारा जुळलेल्याच

शेतकरी संघटनेचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष तुकेश वानोडे हे कॉंग्रेसतर्फे आयोजित मोठ्या कार्यक्रमात पाचशेहून अधिक कार्यकर्त्यांसह प्रवेश करीत असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकद वाढेल, असे एका गटाचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे त्यांच्या प्रवेशाला काहींनी विरोध केल्याची माहिती आहे. राजूरा विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या गोंडपिपरी तालुक्याच्या बाबतीत आमदार सुभाष धोटे हे नेहमीच सावत्रपणाची भूमिका घेत असतात. यानिमित्ताने विरोधकांनी अनेकदा हा मुददा समोर आणला. गोंडपिपरी तालुक्यात अशा विविध राजकीय चर्चा रंगत असून विरोधकही सक्रिय झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com