महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा; पण सरकार सोयीस्कर गप्प का?

संजय राऊत यांचे वक्तव्य शिवराळ आहे. त्यांचे वक्तव्य घरी परिवारात कुणी बघू शकत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी संजय राऊतांवर तोफ डागली.
महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा; पण सरकार सोयीस्कर गप्प का?
Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : महाराष्ट्रात सद्यःस्थितीत जे काही चाललंय, ते बघून मन व्यतित झालं आहे. एक दाम्पत्य हनुमान चालिसा पठण करण्याची भाषा करते, तर त्यांना दंडुकेशाहीने अटक केली जाते. महिला लोकप्रतिनिधीला २० फूट गाडण्याची भाषा केली जाते, पण त्याची साधी दखलंही घेतली जात नाही. सरकार सोयीस्करपणे गप्प का आहे, असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आज सायंकाळी ट्विट करून फडणवीसांनी (Devendra Fadanvis) महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘ महाराष्ट्रातील (Maharashtra) घटना व्यथित करणाऱ्या आहेत. भाजपच्या पोलखोल रथावर हल्ले होतात, आरोपी अटकेत नाही. मोहित कंबोज यांच्यावर हल्ला, पण साधा गुन्हा दाखल नाही. महिला लोकप्रतिनिधीला 20 फूट गाडण्याची भाषा, साधी दखल सुद्धा नाही. हनुमान चालिसा पठणाला राणा दाम्पत्य येतात तर : थेट अटक केली जाते. इतकी दंडुकेशाही, इतका अहंकार, इतका द्वेष, सत्तेचा इतका माज, सरकारच करणार हिंसाचार, एवढीच तुमची मदुर्मकी, असे सवाल करीत सत्तेच्या मस्तीत कसेही वागून घ्या पण, जनता सारे काही पाहते आहे. निव्वळ लज्जास्पद लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार संपला. लोकशाहीचे गाऱ्हाणे गाणारे आज सोयीस्कर गप्प का, असाही प्रश्‍न फडणवीस यांनी केला.

ट्विट करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ते हनुमान चालिसा म्हणताय, त्यावर येवढा राडा कशाला. कुणाच्याही घरावर आंदोलन करायला आमचा विरोध आहे. पण कुणी हनुमान चालिसा म्हणतो म्हणून इतकी माणसं जमा कशाला करायची. तेथे कुणी हल्ला करायला जाणार नव्हते. रवी राणा आणि नवनीत राणा यांना राष्ट्रीय नेता बनवण्याचा विडा शिवसेनेने उचलला का? ते गेले असते एखाद्या कोपऱ्यात हनुमान चालिसा पठण केली असती. कुणी दखलंही घेतली नसती आणि ते चुपचाप निघून गेले असते.

कुणाच्या घरावर जाणे, हल्ला करणे, असे कृत्य करून शिवसेनेच्या नेत्यांना असं वाटतंय की सहानुभूती मिळेल. पण त्यांना सहानुभूती अजिबात मिळणार नाही. घडल्या प्रकाराची हाताळणी शिवसेना नेते आणि गृह विभागाने चुकीच्या पद्धतीने केली आणि सध्या जे चाललंय ते चुकीचं आहे. पोलिसांना हाताशी धरून सगळं केलं जातंय. काल मोहित कंबोज यांच्यावर पोलीस मदत आहे म्हणून हल्ला झाला. मोहित कंबोज यांच्याकडे तलवार आहे, ते बंदूक घेऊन होते, ॲसीड आहे, असं म्हणणं हास्यास्पदच आहे. हल्ल्यानंतर त्यांच्यावर केसेस कशा टाकायच्या याची तयारी त्यांनी केली. पण यांच्या दुर्दैवाने सीसीटीव्ही होते तिथे. सर्व सीसीटीव्ही कडे आमचं लक्ष आहे, की ते पुरावे बघून कारवाई करतात, की दबावाला बळी पडतात, हे आता बघायचे आहे, असे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadanvis
पोलिस घरात पोचताच नवनीत राणांची फडणवीस, राणेंना मदतीसाठी विनंती

पोलिसांच्या भरवशावर त्यांना सत्तेचा माज आहे. गृहमंत्र्यांना चांगलं माहीत आहे की राष्ट्रपती शासन कधी लागते. सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेला सर्व माहीत आहे. वळसे पाटील यांना कमीपणा वाटला पाहिजे की ते गृहमंत्री असताना गृह मंत्रालयाचे बारा वाजलेय. राष्ट्रवादीनेच गृह मंत्रालयाचे बारा वाजवलेय. हा मामला यांना काही सांभाळता आला नाही, आपलं अपयश झाकण्यासाठी हे भाजपचं नाव घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

संजय राऊत यांना विचारतं कोण?

राऊत (Sanjay Raut) द्या अमेरिकेच्या पंतप्रधान यांना घाबरत नाही असं म्हणतील. पण अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना हुंगतात तरी का? संजय राऊत यांना विचारतो कोण? संजय राऊत सारखे कागदी लोक पुढे निरुपयोगी होणार आहेत. संजय राऊत यांना ना शिवसेनेत किंमत आहे ना बाहेर. संजय राऊत यांचे वक्तव्य शिवराळ आहे. त्यांचे वक्तव्य घरी परिवारात कुणी बघू शकत नाही, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर तोफ डागली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.