वजाहत मिर्झांच्या नियुक्तीचा विषय पेटला, कार्यकर्ते म्हणतात ‘त्या’ ठरावाचा उपयोग काय?

जिल्हा कॉंग्रेसचे (Congress) उपाध्यक्ष आणि अल्पसंख्याक समुदाय आणि शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टिका केली आहे.
वजाहत मिर्झांच्या नियुक्तीचा विषय पेटला, कार्यकर्ते म्हणतात ‘त्या’ ठरावाचा उपयोग काय?
Dr. Wajahat Mirza, Congress.Sarkarnama

पुणे : ‘एक व्यक्ती - एक पद’ असा ठराव कॉंग्रेस हाय कमांडच्या उपस्थितीत उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात झाला असताना यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यातील विधान परिषदेचे सदस्य आमदार डॉ. वजाहत मिर्झा एक, दोन नव्हे तर सहावे पद सन्मानाने बहाल करण्यात आल्यामुळे कॉंग्रेसचे नेते व कार्यकर्ते कडवट टिका करू लागले आहेत.

जिल्हा कॉंग्रेसचे (Congress) उपाध्यक्ष आणि अल्पसंख्याक समुदाय आणि शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांवर टिका केली आहे. वजाहत मिर्झा यांना पदांची खिरापत वाटणाऱ्या आमच्या नेत्यांवर हायकमांडने कारवाई करण्याची गरज आहे. पक्षाच्या अशा धोरणांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होत आहे. अनेक पदांवर एकाच नेत्याची वर्णी आणि इतर पदांवर त्यांची मुले व नातेवाईक, यामुळे प्रामाणिक व मेहनती कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे. त्यामुळेच कार्यकर्ते सैरभैर झाले असून इतर पक्षांची वाट धरत आहे.

श्रेष्ठींनी या बाबींची दखल न घेतल्यास आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ते घातक ठरणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्यामुळे कॉंग्रेसला सत्तेत स्थान मिळू शकले. पण हे असेच सुरू राहिल्यास २०२४ मध्ये कॉंग्रेसचा पार धुव्वा उडणार असल्याची भितीही सिकंदर शहा यांनी व्यक्त केली आहे. पक्षातील काही नेते हायकमांडची दिशाभूल करीत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. आता कर्तव्य कठोर असलेले आणि प्रसंगी भल्याभल्यांना अंगावर घेणारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करून ‘एक व्यक्ती - एक पद’ या धोरणावर अंमल करावा, अशी मागणीही सिकंदर शहा यांनी केली.

Dr. Wajahat Mirza, Congress.
आमदाराकडेच सहावे पद येताच काॅंग्रेस नेतेही चक्रावले : नाना पटोलेंनी घेतली अॅक्शन

उदयपूर येथे झालेले चिंतन शिबिर चार राज्यांतल्या पराभवानंतर कॉंग्रेसला ऊर्जा देणारे ठरेल अशी अशा कार्यकर्त्यांना होती. मात्र झाले उलटेच. एक व्यक्ती - एक पद, असे धोरण राहील, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा हे पूर्वीच पाच पदे भूषवीत असताना त्यात पुन्हा महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक अध्यक्षपद देण्यात आल्याने पक्षाने स्वतःच्या धोरणाला तिलांजली दिल्याची टिका कॉंग्रेसचे जवळपास सर्व नेते करीत आहेत. मुंबईच्या बैठकीत राज्य प्रभारींनीही या नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली. सततच्या पराभवांनंतरही ज्येष्ठ नेते धडा घेत नसतील, तर कॉंग्रेसचे पतन अटळ आहे, असा सूर कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते आवळत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in