
हाती आलेल्या ग्रामपंचायत निकालात गोंदियात भाजप 143 जागा जिंकत मोठा भाऊ ठरला आहे, तर काँग्रेस ९३, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 73 जागा मिळवत समाधानकारक कामगिरी बजाविली आहे. दरम्यान गोंदियात पहिल्यांदा ठाकरे गटाने खाते उघडले असून शिंदे गटाला मात्र भोपळा मिळाला आहे. दरम्यान गोंदियात आमदार विनोद अग्रवाल यांनी आपला गढ कायम राखला आहे. त्यांच्या चाबी संघटनेने 31 ग्रामपंचायतींची चाबी आपल्या हातात ठेवली आहे.
गोंदिया (Gondia) हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांचा जिल्हा आहे. मात्र या जिल्ह्यावर डॉ. परिणय फुके (Parinay Fuke) यांच्या माध्यमातून भाजप हळूहळू आपला कब्जा करू लागला आहे. जिल्हा परिषदेवर ताबा मिळविल्यानंतर आता अधिक ग्रामपंचायतींवर कमळ फुलविले आहे. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या या गडात आता कॉंग्रेससह उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackery) व चाबी संघटनेनेही आपला फायदा करून घेतला आहे. जेव्हापासून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे जिल्ह्यावर दुर्लक्ष झाले, तेव्हापासून घड्याळाचे काटे हळूहळू संथ होऊ लागले आहेत.
राष्ट्रवादीचे इतर नेते भाईजींवर भिस्त ठेवून आपआपल्या व्यवसायात खूश आहेत. पक्ष वाढीसाठी विशेष अशी कामगिरी अद्याप या नेत्यांकडून होत नसल्याने राष्ट्रवादीची प्रत्येक निवडणुकीत पीछेहाट होताना दिसत आहे. दुसरीकडे भाजप सोडून गेलेले अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रात आपली पकड मजबूत करून ठेवली आहे. एकट्या चाबी संघटनेने 18 जागा मिळविल्या आहेत. यात कॉंग्रेसचे आमदार शेषराम कोरेटी यांनीसुद्धा आपली बाजू राखत आपल्या विधानसभा क्षेत्रात अधिक ग्राम पंचायती ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान आलेली आकडेवारी इतर पक्षांना समाधानकारक असली तरी मात्र राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात होत असलेली पीछेहाट नेत्यांना विचार करायला लावणारी आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.