सुरजागडची सुनावणी गडचिरोलीला न घेता एटापल्लीला घ्यावी, राजे अम्ब्रिशरावांची मागणी...

नियमानुसार ज्या एटापल्ली तालुक्यात तो लोहप्रकल्प आहे त्या ठिकाणी ही जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी राजे अम्ब्रिशराव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे.
सुरजागडची सुनावणी गडचिरोलीला न घेता एटापल्लीला घ्यावी, राजे अम्ब्रिशरावांची मागणी...

अहेरी (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाची उत्खनन क्षमता ३ दशलक्ष टन प्रतिवर्ष वरून १० दशलक्ष टन प्रतिवर्ष करण्याचा वाढीव प्रस्ताव कंपनीने गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडे दिलेला आहे. या संदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी आज गडचिरोली येतील जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) ठेवण्यात आले आहे, नियमानुसार ज्या एटापल्ली तालुक्यात तो लोहप्रकल्प आहे त्या ठिकाणी ही जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी राजे अम्ब्रिशराव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्याकडे केली आहे.

एटापल्ली हे जनसुनावणीसाठी अपेक्षित आणि जनतेसाठी सोयीचे असताना तसे न करता मुद्दामहून जिल्हा प्रशासनाने गडचिरोली (Gadchiroli) येथे सदर जनसुनावणी ठेवल्याने स्थानिक अनेक नागरिक या जनसुनावणी पासून वंचित राहण्याची भिती आहे. तसेच या जनसुनावणीची प्रसिद्धी स्थानिक वृत्तपत्रात तसेच इतर माध्यमांतून न झाल्याने या जनसुनावणीबाबत अनेकांना माहितीही मिळालेली नाही. त्यामुळे बहुतांश स्थानिक नागरिक गडचिरोली येथे अनुपस्थित राहू शकतात तसे झाले तर आपले म्हणणे ते सदर जनसुनावणी दरम्यान मांडू शकणार नाहीत.

वाढीव १० दशलक्ष टन प्रतिवर्ष उत्खनन क्षमता झाली तर सुरजागड प्रकल्प परिसरातील १३ गावांना त्यांच्या धोका निर्माण होऊ शकतो. तसेच सध्या सुरू असलेल्या सुरजागड प्रकल्पाने अहेरी विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झाली असून, अपघाताचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्थानिक बेरोजगारांना नोकरी अगदी नाहिच्या बरोबरीने मिळालेली आहे. तसेच प्रदूषणही नियंत्रणाच्या बाहेर गेले आहे. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये सुरजागड लोह प्रकल्पाबाबत प्रचंड नाराजी आहे. ही जनभावना विचारात घेऊन वाढीव उत्खननाला वरील सर्व समस्या मार्गी लागत पर्यंत कृपया मान्यता देऊ नये, असे राजे अम्ब्रिशराव यांनी निवेदनात म्हटले आहे.

सुरजागडची सुनावणी गडचिरोलीला न घेता एटापल्लीला घ्यावी, राजे अम्ब्रिशरावांची मागणी...
सत्ताधाऱ्यांना गडचिरोली जिल्हा मागास ठेवायचा आहे, झेडपी अध्यक्षांचा आरोप...

सुरजागड लोह प्रकल्पाबाबतीत गडचिरोली आज होणारी जनसुनावणी रद्द करून एटापल्ली या तालुकास्थळी ती जनसुनावणी घेण्यात यावी. तसेच यासाठी स्थानिक वृत्तपत्रात व इतर माध्यमांतून व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी, ही अहेरी विधानसभा क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेची मागणी विचारात घेऊन योग्य उपरोक्त निर्णय घ्यावा, असेही राजे अम्ब्रिशराव यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in