पालकमंत्री नगरसेवकावर संतापले म्हणाले; आवाज खाली करा, नाही तर…

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी महानगरपालिकेत सुनावणी घेतली. यावेळी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी चिडून जाऊन विविध आरोप केले.
पालकमंत्री नगरसेवकावर संतापले म्हणाले; आवाज खाली करा, नाही तर…
Dr. Nitin RautSarkarnama

नागपूर : महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक माजी झाल्यापासून शहरात समस्या वाढल्या आहेत. दिवसागणिक लोकांच्या तक्रारी वाढत आहेत. उत्तर नागपुरातील विकास कामे रखडलेली आहेत. त्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानगरपालिकेत सुनावणी घेतली. यावेळी कॉंग्रेसचे (Congress) माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी चिडून जाऊन विविध आरोप केले. त्यावर पालकमंत्री संतापले.

गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर नागपुरातील (Nagpur) विकास कामांच्या फाईल्स रोखल्याचा आरोप करीत पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी घेतलेल्या सुनावणीत मनोज सांगोळे यांनी चांगलाच हंगामा केला. सांगोळे यांच्या आरोपामुळे पालकमंत्रीही संतप्त झाले. अखेर सांगोळे यांना आवाज खाली करा, मलाही आवाज चढविता येतो, असा इशारा पालकमंत्र्यांना द्यावा लागला. त्यानंतरही सांगोळे शांत झाले नाही, हे विशेष.

नागरिकांच्या प्राप्त तक्रारीवर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महापालिकेत सुनावणी घेतली. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, नासुप्र सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, स्‍मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी चिन्मय गोतमारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठक सुरू होताच कॉंग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सांगोळे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला. सांगोळे यांनी त्यांच्या प्रभागातील अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्या, कामांबाबत जोरदार आवाजात तगादा लावला. त्यामुळे पालकमंत्री डॉ. नितीन राऊतही संतप्त झाले.

Dr. Nitin Raut
उर्जामंत्री नितीन राऊत आक्रमक; अदानींना पाठवली नोटीस

पांजरा येथे नव्याने बांधलेल्या टाकीतून पाणीपुरवठा करण्याच्या मागणीसह त्यांनी नाला, प्रसूतिगृह, रस्ता आदी कामे मंजूर असूनही केली जात नसल्याकडे लक्ष वेधले. त्यांच्या बोलण्याच्या शैलीमुळे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांना दम दिला. परंतु रेंगाळलेल्या कामामुळे त्रस्त झालेल्या सांगोळे यांनी त्यांच्याकडेही दुर्लक्ष केले अन् अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेणे सुरूच ठेवले. त्यामुळे ही बैठक चांगलीच वादळी ठरली. मनोज सांगोळे यांच्यासह सुरेश पाटील, सतीश पाली, राकेश निकोसे यांनीही समस्या मांडल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.