माथ्यावर गद्दारीचा टिळा लावून आलेले चाळीस चोरांचे सरकार लवकरच कोसळणार !

उपस्थितांची गर्दी बघून तुमचे प्रेम द्यायला तुम्ही येथे आला असून, घाबरू नकोस, या राज्यातील जनता तुझ्या पाठीशी उभी आहे, हे आश्वस्त करण्यासाठी तुम्ही भर उन्हात उपस्थित असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama

अकोला : माथ्यावर गद्दारीचा टिळा लावून चाळीस चोरांचे सरकार बघ्याच्या भूमिकेत काम करीत आहेत. हे सरकार लवकरच कोसळणार आणि राज्यात निवडणूक होईल, असे भाकीत पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आयोजित सभेत शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.

आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे अकोला (Akola) विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी राजराजेश्वराचे दर्शन घेत बाळापूर येथील सभेला हजेरी लावली. या सभेला सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, आमदार नितीन देशमुख, (MLA Nitin Deshmukh) जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर आदींसह शिवसेना (Shivsena) व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांची गर्दी बघून तुमचे प्रेम द्यायला तुम्ही येथे आला असून, घाबरू नकोस, या राज्यातील जनता तुझ्या पाठीशी उभी आहे, हे आश्वस्त करण्यासाठी तुम्ही भर उन्हात उपस्थित असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

ठाकरे यांनी राज्यातील सरकार घटनाबाह्य असल्याचे सांगून, तरुण, शेतकरी, बेरोजगार, कामगार, शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी या सरकारला काहीही घेणे देणे नसल्याचे सांगितले. ५० खोके घेवून, एकदम ओके असलेले हे सरकार कुठे आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सरकार केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे. पर्यावरण संपविण्याचे काम सुरू आहे. उद्योग संपविले जात आहेत. शिवसेना संपविण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोपही आमदार ठाकरे यांनी केला. शेवटी त्यांनी उपस्थितांना हात वर करून तुमचे प्रेम असे माझ्या पाठीशी कायम राहू द्या, असे आवाहन केले.

कृषी मंत्र्यांचे नाक काय? गद्दार...!

राज्यात एकीकडे शेतकरी अडचणीत असताना या राज्याचे कृषिमंत्री कुठे आहेत? त्यांचे नाव काय? तुम्हाला माहिती आहे का, असा प्रश्न आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केला तेव्हा. उपस्थित जनतेने कृषी मंत्र्यांचे नाव ‘गद्दार’ असल्याचे उत्तर दिले. कृषिमंत्र्यांच्या कारभारावर ठाकरे यांनी जोरदार टिका केली.

ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा खुर्च्या खाली करा!

अकोला जिल्ह्यासह राज्यात तीन-चार वेळा अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीची मदत अद्याप मिळाली नाही. पीक विमा मिळाला नाही. आम्ही घसे कोरडे करून ओरडतोय, की ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा खुर्च्या खाली करा. पण या सरकारच्या कानावर त्याची हाकच जात नाही, अशी टिका आदित्य ठाकरे यांनी केली. आज उद्धव ठाकरे यांचे सरकार असते तर ओला दुष्काळ जाहीर झाला, असे ते म्हणाले.

Aditya Thackeray
शिवसेनेतील फुटीला आम्हीच जबाबदार..! आदित्य ठाकरेंनी स्वत: कबुली दिली

राज्याची सेवा करीत असाल तर १०० नावे ठेवा!

आमदार आदित्य ठाकरे यांनी विरोधकांचा समाचार घेताना मला छोटा पप्पू म्हणून हिणवल्याचे सांगितले. या राज्याची सेवा करीत असला तर तुम्ही मला १०० नावे ठेवली तरी चालेल, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री कोण?

राज्यातील घटनाबाह्य सरकारचे खरे मुख्यमंत्री कोण, असा प्रश्न युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांना केला. तेव्हा उपस्थितांनी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतले. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार संबोधून त्यांच्यावर जोरदार टिका केली.

जनतेचे हाल, आमदार भांडणात व्यस्त..

आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील भांडणाचा उल्लेख करीत आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेचे हाल सुरू असताना आमदार मात्र, स्वतःच्या फायद्यासाठी आपसात भांडत असल्याची टिका केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com