शेतकरी असल्याने प्रेयसीचा नकार; प्रेमवीराची थेट मुख्यमंत्र्यांनाच साद

hingoli| Love letter| CM Uddhav Thackeray| तुमच्या महाराष्ट्रातील तुमच्या एका मुलासाठी वहिनीला विचारा खरंच असं असतं का?
CM Uddhav Thackeray
CM Uddhav Thackeray

हिंगोली : प्रेमात सर्व काही माफ असतं पण शेतकरी होऊन प्रेम करणं चूक असतं, अस एक उदाहरण महाराष्ट्राच्या हिंगोलीतून समोर आले आहे. प्रेम करणाऱ्या एका तरुणाने आपल्या प्रेमासाठी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच (Uddhav Thackeray) साद घातली आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत या तरुणाने आपण शेतकरी (Farmer) असून आपली शेतजमीन कमी असल्याने आपले प्रेम नाकारले गेल्याचे दुखं व्यक्त केले आहे. तरुणाने या पत्रात स्वत:चे नाव लिहीले नसले तरी हे पत्र हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील तरुणाने लिहीले असल्याचे दिसत आहे. एका वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं आहे का? असाच सवालच या प्रेमवीराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रात केला आहे. तरुण आपल्या पत्रात म्हणतो की, साहेब लिहिताना खूप दुःख होत आहे. महाराष्ट्रावर तुमचं खूप प्रेम आहे. तुम्ही कधी कुणावर प्रेम केलं होत का हो? आयुष्यात कधी तरी केलं असेल तर माझ्या प्रश्नाला उत्तर द्या. प्रेम हे धन-दौलतीचे मोहताज असते का हो? मी पण कोणावर तरी प्रेम केलं, पण शेत जमीन कमी असल्याने माझ्या प्रेमाला विरोध केला असं असतं का ? असा सवाल युवकानं पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे.

CM Uddhav Thackeray
भाजप नेत्यांतच जुंपली, तुम्ही महापालिकेची ग्रामपंचायत करून टाकली!

मी ऐकलं होतं हिर रांजा, लैला-मजनू, शिरी फरहाद, सोनी महिवाल यांनी जर प्रेम केलं असेल तर मृत्यू का? प्रेमात विरह का असतो? ज्या प्रेमात विरह नसेल तर त्याचा मी धिक्कार करतो. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातील तुमच्या एका मुलासाठी वहिनीला विचारा खरंच असं असतं का? असं त्याने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

शेतकरी होऊन प्रेम करणं खरंच चुकीचं आहे का? असाच सवालच या प्रेमवीराने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रात केला आहे. खरंतर तुम्हाला भेटून खूप रडावंस वाटत आहे. पण उद्धवसाहेब, तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेता. त्यांचे प्रश्न सोडवता, उद्धवसाहेब आजपर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं, त्यांचे प्रश्न सोडवले. पण माझं काय? या पुरोगामी महाराष्ट्रात प्रेमात आत्महत्या करावी लागत असेल तर मी प्रेमाचा धिक्कार करतो आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल अशी वाट पाहतो. अन्यथा जगातून निघून जाण्याव्यतिरिक्त माझ्याकडे पर्याय नाही. उत्तर कधी देत आहे साहेब, वाट पाहतोय, असं पत्रात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com