सिंदखेड राजा तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या पुलांचे गर्डर कोसळले ; जीवित हानी टळली!

बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पिंपळखुटा शिवारामध्ये असलेल्या पुलाच्या कामातील गर्डर कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला.
Accident in Buldana District
Accident in Buldana DistrictSarkarnama

सिंदखेड राजा (जि. बुलडाणा) : बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Highway) पिंपळखुटा शिवारामध्ये असलेल्या पुलाच्या कामातील गर्डर कोसळल्याने मोठा गोंधळ उडाला. मात्र या घटनेत कोणतीच जीवित वा वित्त हानी झाली नाही, अशी प्राथमिक माहिती आहे.

सध्या समृद्धी महामार्गाचे काम जोमाने सुरू आहे. कारण तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर असलेल्या पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. तालुक्यातील पिंपळखुटा येथील समृद्धी पॉइंट नंबर ३३२ येथे पुलाच्या गर्डर फिकशिंगचे काम सुरू होते, क्रेनच्या सहायाने सुरू असलेल्या या कामातील एक गर्डर क्रेनने उचलत असताना खाली कोसळला. या घटनेत क्रेनसह एका वाहनाचे नुकसान झाले आहे.

या घटनेत कोणतीच जीवित हानी झाली नसल्याचे समृद्धीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. व्हायडक आकाराचा हा पिलर कोसळल्याने समृद्धीच्या कामात कोणताच अडथळा होणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या अभियंत्यांसह समृद्धी महामार्गाचे अधिकारी पाहणी करून काम पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. गर्डर कोसळल्या मुळे मोठी तांत्रिक अडचण नसल्याचे समृद्धीच्या सूत्रांनी सांगितले आहे.

Accident in Buldana District
भाजपच्या माजी मंत्र्याला धोबीपछाड देत बच्चू कडुंची बुलडाणा जिल्ह्यात एंट्री...

काळ आला होता, परंतु वेळ आली नव्हती...

समृद्धी महामार्गाचे काम प्रगतिपथावर असल्यामुळे मार्गावर काम करण्यासाठी मजूर मोठ्या संख्येने आहेत. पिंपळखुटा येथे पुलाचे काम सुरू आहे. याच पुलाचे गर्डर कोसळले. त्यावेळी मजूर जेवण करत होते. त्यामुळे कोणतेही मजूर त्याठिकाणी नसल्याने जीवित हानी झाली नाही त्यामुळे ‘काळ आला होता, परंतु वेळ आली नव्हती’ची प्रचिती यावेळी आली. परंतु या पुलाखाली उभे असलेल्या वाहनांवर गर्डर पडल्यामुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com