माजी वनमंत्री अधिकाऱ्यांवर बरसले; म्हणाले, नेता बनू नका, उभे राहून काम करून घ्या...

ही बैठक संपल्यानंतर दुसऱ्या एखाद्या बैठकीत गेल्यावर झुडुपं काढण्याचे काम तुम्ही विसरून जाल, असे म्हणत आमदार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी अधिकाऱ्यांना दटावले.
Sudhir Mungantiwar in Meeting
Sudhir Mungantiwar in MeetingSarkarnama

चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत परवा एक कामगार आणि काल एक १६ वर्षीय मुलगा वाघाच्या हल्ल्यात ठार झाला. त्यानंतर आज सकाळी कामगार भडकले आणि चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने केली. यामध्ये सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत माजी वनमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले. (Sudhir Mungantiwar News)

नेता बनू नका, कामाचे नेता बना आणि उभे राहून काम करून घ्या. नाहीतर ही बैठक संपल्यानंतर दुसऱ्या एखाद्या बैठकीत गेल्यावर झुडुपं काढण्याचे काम तुम्ही विसरून जाल, असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दटावले. वातानुकूलित कार्यालयात बसून कुणी आम्हाला व्याघ्रप्रेम शिकवू नये, आम्ही जंगलात (Forest) राहून प्रेम केले आहे. तेव्हा कुठे वाघांची संख्या वाढून २८३ झाली. पण आता तुमच्या चुकीने जर का वाघाच्या (Tiger) हल्ल्यात तिसरा बळी गेला, तर जनता तुम्हाला सळो की पळो करून सोडेल, हे विसरू नका. असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांसह (Collector) सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावले.

बैठकीनंतर बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपुरात वाघाचा थरार जनता अनुभवत आहे. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी, थर्मल पॉवर स्टेशनचे चीफ जनरल मॅनेजर व जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्या विभागातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक आत्ता आम्ही घेतली. या बैठकीत आम्ही काही निर्णय घेतले. वनविभागाच्या सचिवांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. चंद्रपूर शहरालगतच्या परिसरात १० वाघ आहेत. या १० वाघांचे रीलोकेशन करण्याची परवानगी तात्काळ देण्यात यावी. यामध्ये जी मदत केली जाते ती मी वनमंत्री असताना ही मदत १५ लक्ष रुपये रुपयांपर्यंत वाढविली होती. आता ती २० लाख रुपयांपर्यंत वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Sudhir Mungantiwar in Meeting
अजितदादा, शेजाऱ्याचे अनुकरण करा! मुनगंटीवार यांनी दिला सल्ला

वाघाच्या हल्ल्यात दोन दिवसांत दोन जणांचे मृत्यू झाले. परिसरात झुडपं आहेत, या झुडपांचा आधार घेऊन वाघ मानवावर हल्ले करतात, ही झुडपे काढण्याचा निर्णय घेण्यात आला. मध्यप्रदेशच्या धर्तीवर अत्याधुनिक यंत्रणा बसवण्याची गरज आहे. या यंत्रणेमध्ये कोणताही वन्यप्राणी जंगलातून मानवाच्या वस्तीकडे यायला निघाला की, अलार्म वाजतो. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्षाच्या घटना गेल्या एक दीड वर्षात वाढल्या आहेत. जगात सर्वाधिक वाघ भारतात आहेत. १९३ देशांपैकी १४ देशांमध्ये वाघ आहेत आणि या १४ पैकी सर्वाधिक वाघ भारतात आहेत. भारतातील सर्वाधिक वाघ चंद्रपूर जिल्ह्यात आहेत. ज्या लोकांनी वाघांचे संरक्षण, संवर्धन केले त्यांच्यासाठी बजेटमध्ये तरतूद केली जात नाही. पण आता या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे.

वाघांपासून येथील जनतेचे संरक्षण करण्यासाठी ज्या यंत्रणा उभारण्याची गरज आहे, त्यासाठी निधी दिला जात नाही. सरकारने यासंबंधातील निर्णय वेगाने घेतले पाहिजे. सरकारी काम अन् चार महिने थांब, ही भूमिका आपल्याला न्याय देऊ शकणार नाही. कारण एक वाघ जर पिंजऱ्यात पकडायचा झाला, तर त्याची परवानगी घेण्याचा विषय मुंबईपर्यंत जातो. अशा निर्णयांमध्येसुद्धा शिथिलता देण्याची गरज आहे. आज सीसीएफ (मुख्य वनसंरक्षक) असणारा अधिकारी उद्याची पीसीसीएफ (प्रधान मुख्य संरक्षक) होतो. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले पाहिजे. विशेष करून ज्या जिल्ह्यांमध्ये वाघ आणि मानव संघर्ष होतो, त्या जिल्ह्यासाठी तरी हा निर्णय स्थानिक स्तरावर अधिकाऱ्यांना देणे गरजेचे असल्याचेही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com