बुलढाण्यात राजकारण तापले : सेना खासदाराची पक्षाच्या आंदोलनाला दांडी

खुद्द खासदारच (Mp Pratap Jadhav) न आल्याने शिवसैनिकांना नाराजी व रोष व्यक्त केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.
Shivsanik on Eknath Shinde.
Shivsanik on Eknath Shinde.Sarkarnama

बुलडाणा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील एकनाथ शिंदे यांनी पुकारलेले बंड आज न्यायालयात पोहोचले. दरम्यान शिंदे आणि ठाकरे यांच्या समर्थकांनी राज्यभर आंदोलने आणि बैठकांचा सपाटा लावला आहे. आज बुलडाण्यातही (Buldana) शिवसैनिकांनी बैठक आयोजित केली होती. पण या बैठकीकडे खासदार प्रताप जाधव (MP Pratap Jadhav) यांनी पाठ फिरवली. त्यामुळे शिवसैनिक चिडलेले आहेत. बुलाडाण्यातील शिवसेनेचे दोन आमदार संजय गायकवाड आणि संजय रायमूलकर हे दोन्ही आमदार बंडात सहभागी आहेत. ते दोघेही जाधव यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे खासदारांनीच या बंडाच्या विरोधात न बोलण्यासाठी आंदोलनाला दांडी मारल्याची चर्चा सुरू झाली.

खुद्द खासदारच न आल्याने शिवसैनिकांनी नाराजी व रोष व्यक्त केला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण ढवळून निघाले आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि पुढील भूमिका ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार होती. आजच्या बैठकीत खासदार जाधव शिवसैनिकांना मार्गदर्शन करून पुढची दिशा काय असेल, याबाबत ते बोलणार होते. पण त्यांनीच दांडी मारल्यामुळे शिवसेनेच्या समर्थनार्थ असलेल्या या बैठकीवर प्रश्‍नचिन्ह उभे झाले आहे.

आजच्या बैठकीला जिल्ह्यातील पदाधिकारी व शिवसैनिक मिळून फक्त २०० जण हजर होते. त्यामुळे या बैठकीकडे जिल्ह्यातील शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. याशिवाय खासदार प्रतापराव जाधव यांनीसुद्धा या बैठकीला अनुपस्थिती दाखविल्याने याठिकाणी शिवसैनिकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे. या अनुपस्थितीवर शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले. एकंदरीत बुलडाण्यातील शिवसैनिक अद्यापही संभ्रमात असल्याचे दिसत आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत आम्ही आहोत आणि गद्दार कितीही दिवस परराज्यांत लपले. तरीही आम्ही त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. कारण काहीही केले तरी त्यांना महाराष्ट्रात यावेच लागणार आहे. बंडखोरांपैकी २० ते २२ आमदारांशी आमचा संपर्क सुरू आहे आणि महाराष्ट्रात आल्यावर ते शिवसेनेत येतील, हा विश्‍वास आहे. जे गेले त्यांचा विषय संपलेला आहे. बंडखोरांनी थेट उद्धव ठाकरेंना सांगायला पाहिजे होते. त्यांनी सांगितले असते, तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडता आली असती. पण त्यांनी असा झोपेत पाठीवर वार करायला नको होता, असे शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख छगन मेहेत्रे म्हणाले.

Shivsanik on Eknath Shinde.
पुण्यात शिवसेनेला धक्का : कट्टर पदाधिकाऱ्याने धरली एकनाथ शिंदे गटाची वाट!

आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहोत. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अजूनही विनंती आहे की, त्यांनी परत यावे. शिंदेंच्या मागे लागून आपल्या आयुष्याचं खोबरं करू नये. सद्यःस्थितीत फक्त १६ आमदारांना अपात्र ठरविण्याचे ठरले आहे. खासदार प्रताप जाधवांनी आजच्या बैठकीला यायला पाहिजे होते. पण ते आले नाहीत. त्यामुळे सिवसैनिक संतापला आहे. त्यांनी अजूनही तऱ्यात-मळ्यात करू नये. काय ती एकदा ठोस भूमिका घ्यावी, असा सल्लाही मेहेत्रे यांनी खासदारांना दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com