Fadanvis : डीपीसीमधील कामांचे भवितव्य नवीन पालकमंत्री फडणवीस यांच्या हाती..

जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आता स्थगिती असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

सुगत खाडे

अकोला : जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नावाची घोषणा झाली आहे. पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे आता स्थगिती असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. यापूर्वीचे पालकमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी जिल्हा डीपीसीतून मंजूर केलेल्या कामांना नवे पालकमंत्री स्थगिती देतात किंवा जुन्या कामांना कायम ठेवत नवीन विकास कामे प्रस्तावित करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान नवीन पालकमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्याने २१४ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेतील कामे सुद्धा मार्गी लागणार आहेत. राज्य शासनाकडून (State Government) विविध विकास कामांसह उपक्रमांसाठी जिल्हा नियोजन समितीला निधी मंजूर करण्यात येतो. या निधीच्या वितरणाचे नियोजन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) करण्यात येते. दरम्यान जून महिन्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) कोसळले आणि शिवसेनेतील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मोठा गट व भाजपने एकत्र येत सत्ता स्थापन केली.

नवीन सरकारने महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातील कामांना स्थगिती दिली होती. त्यामध्ये डीपीसीतून करण्यात आलेल्या विकास कामांचा सुद्धा समावेश होता. दरम्यान सदर कामे पुढे सुरू ठेवायची की नाहीत किंवा कसे, याबाबतचा निर्णय नवनियुक्त पालकमंत्र्यांच्या सहमतीने घ्यावा, अशा आशयाचे पत्र शासनाच्या नियोजन विभागाने जारी केले होते. त्यामुळे आता नवीन पालकमंत्री कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Devendra Fadanvis
Devendra Fadnavis : बघा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

नवीन पालकमंत्री घेणार निर्णय..

आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये विकास कामांवर खर्च करण्यासाठी जिल्ह्यातील नियोजन विभागाला जुलै महिन्यापर्यंत केवळ १४ कोटी ९८ लाख रुपयांचाच निधी मिळाला होता. सदर निधीतून जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी १ एप्रिलपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत एक कोटी ७५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी दिली होती. परंतु सदर विकास कामांना शासनाने थांबविण्याचे आदेश दिले होते. त्यासोबतच इतर कामांसंदर्भात सुद्धा नवीन पालकमंत्री निर्णय घेतील, असा उल्लेख शासनाच्या आदेशात करण्यात आला होता. दरम्यान आता या कामांचे भवितव्य नवीन पालकमंत्री यांच्या हाती असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com