राज्यपालांनी सूत्रसंचालकाला खडसावले; 'तुला मराठी माहित नाही का?'

मराठी (Marathi) ही आपली मातृभाषा
राज्यपालांनी सूत्रसंचालकाला खडसावले; 'तुला मराठी माहित नाही का?'
Bhagatsingh koshyari

यवतमाळ: हा महाराष्ट्र (Maharashtra) आहे, इथं कार्यक्रमांमध्ये मराठीतचं (Marathi) सूत्रसंचालन व्हायला पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे, याचं भान राखलं पाहिजे, राज्यात सर्वत्र मराठी भाषा अनिवार्य असली पाहिजे, असं म्हणत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषेतून बोलण्याचा आग्रह धरला आहे. जवाहरलाल दर्डा (Jawahar Darda) यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इंग्रजीत सूत्रसंचालन करण्याच्या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी नाराजी व्यक्त केली.

कार्यक्रमात बोलताना त्यांनी एक आठवण शेअर केली. महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थांच्या उपक्रमांसाठी मला आमंत्रणे येतात. काही दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्या कार्यक्रमात सूत्रसंचालन करणारा इंग्रजी भाषेतून सूत्रसंचालन करत होता. त्या व्यक्तीला हटकत तुला मराठी ठाऊक नाही का? असं मी त्याला विचारलं असल्याचं कोश्यारी यांनी सांगितलं.

Bhagatsingh koshyari
पार्टीनं केला घात; मेडिकल कॉलेजमधील 182 जणांना कोरोनाचा विळखा

त्यावेळीच मी त्याला हा महाराष्ट्र आहे, इथं मराठीमध्ये सूत्रसंचालन करायला हवं. प्रमुख पाहुणे जर इतर राज्यातील असतील किंवा परदेशातील असतील आणि त्याला मराठी हिंदी समजत नसेल तर इंग्रजीचा वापर करण्यास हरकत नाही, असंही मी त्याला सांगितलं, असल्याची आठवण राज्यापालांनी करुन दिली. मराठी ही भाषा संस्कृत आणि हिंदी प्रमाणेच गोड आहे. मराठी भाषा सरळ, साधी आहे. मराठीचं वाचन करु शकतो आणि समजू शकतो, असाही मी त्याला सांगितलं असल्याचं भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

दरम्यान राज्यपाल कोश्यारी गेल्या तीन दिवसांपासून विदर्भाच्या दौऱ्यावर होते. याच दौऱ्यादरम्यान यवतमाळमध्ये जवाहर दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in