Amravati : मोठा भाऊ म्हणाला लहान्याला, माझ्या आधी लग्न का केले? मग केले चाकूने वार...

Crime : अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काजना या गावात काल सायंकाळी घडली.
Amravati Crime News
Amravati Crime NewsSarkarnama

Amravati Crime News : लहान भावाने आधी प्रेमविवाह केला. त्यामुळे आपल्या लग्नाला उशीर होतो, असा राग डोक्यात धरून मोठ्या भावाने लहान भावाचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. ही घटना अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील काजना या गावात काल सायंकाळी सात ते साडेसात वाजताच्या सुमारास घडली.

सुधीर चरणदास घरडे (रा. काजना) असे मृत युवकाचे नाव असल्याची माहिती लोणीचे ठाणेदार मिलिंदकुमार धवणे यांनी दिली. लोणी पोलिसांनी (Police) या प्रकरणात संशयित सचिन ऊर्फ सतीश चरणदास घरडे (वय ३०, रा. काजना) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा (Crime) दाखल केला आहे. सुधीर याच्यावर वार करून सचिन ऊर्फ सतीश हा फरार झाला, असे अधिकाऱ्यांनी (Police Officer) सांगितले. २०२१ मध्ये सुधीरचा एका युवतीशी प्रेमविवाह झाला होता.

सुधीर हा सचिन पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे. लहान भावाने आधी लग्न केले. त्यामुळे आपल्या लग्नाला उशीर होत आहे, याचा राग सचिन ऊर्फ सतीशने मनात धरला होता. तेव्हापासून सुधीर व सचिन या दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडणे सुरू झाली. काल सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर पुन्हा सुधीर व सचिन या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. शिवीगाळ, वादावादी यातून राग अनावर झाल्याने सचिन ऊर्फ सतीशने लहान भाऊ सुधीर याचे पोटात धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान सुधीर घरडे याचा मृत्यू झाल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले.

Amravati Crime News
Amravati : अमरावती ‘पदवीधर’ निवडणूक: भाजपची तयारी जोरात, कॉंग्रेस स्वबळावर...

या घटनेनंतर ग्रामस्थांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. लोणी पोलिसांनी मृत सुधीरची पत्नी कशीश सुधीर घरडे हिच्या तक्रारीवरून संशयित सचिन ऊर्फ सतीश घरडे ( वय ३०,रा काजना ) याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आज जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनानंतर सुधीर घरडे याचा मृतदेह पोलिसांनी नातेवाइकांच्या स्वाधीन केला. संशयित मारेकऱ्यास वृत्त लिहीस्तोवर अटक झाली नव्हती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in