पुणेच्या धर्तीवर विदर्भात साखर संशोधन केंद्राचे स्वप्न साकार होणार..!

मी संबंधितांच्या संपर्कात राहून पाठपुरावा करणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे, असे डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी सांगितले.
Dr. Ashish Deshmukh
Dr. Ashish DeshmukhSarkarnama

नागपूर : पुणेच्या धर्तीवर चांगल्या प्रतीचे ऊस उत्पादन मिळून विदर्भात साखर संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यात चर्चा झाली. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे कॉंग्रेसचे काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. आशीष देशमुख म्हणाले.

विदर्भात (Vidarbha) चांगल्या प्रतीचे ऊस उत्पादन घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न व्हावे आणि येथील शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, हा यामागील उद्देश आहे. त्यादृष्टीने पाहणी करण्यासाठी पुणे (Pune) येथील वसंतदादा शुगर इंस्टीट्युट या प्रतिष्ठित साखर संशोधन केंद्राचे शिष्टमंडळ १३ ऑगस्ट २०२२ ला नागपूर येथे आले होते. साखर संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी १०० एकर कृषी उपयुक्त जागेची गरज आहे. या शिष्टमंडळाने विविध जातीच्या ऊसाची लागवड करून भरीव उत्पन्न कसे घेता येईल याची पाहणी केली आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. विदर्भातील शेतकरी समृध्द कसा होईल, यासाठी मी प्रयत्नशील आहे. हा प्रकल्प अभिनंदनीय असून नागपूर येथे लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, यासाठी मी संबंधितांच्या संपर्कात राहून पाठपुरावा करणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे, असे डॉ. आशिष देशमुख (Dr. Ashish Deshmukh) यांनी सांगितले.

डॉ. आशिष देशमुखसुद्धा १३ ऑगस्टला नागपूर येथे वसंतदादा शुगर इंस्टीट्युट, मांजरी बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे या साखर संशोधन केंद्राच्या शिष्टमंडळासोबत होते. विदर्भात आणि मुख्यत्वे नागपूर जिल्ह्यातील परिसरात पुणेच्या धर्तीवर साखर संशोधन केंद्र सुरु करण्यात यावे, यासाठी ते पाठपुरावा करणार आहेत. विविध जातीच्या ऊसाची लागवड करून साखर संशोधन केंद्र सुरु केल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी त्यांना आशा आहे. या कामासाठी वसंतदादा शुगर इंस्टीट्युटच्या शिष्टमंडळाने कन्हाळगाव (बुटीबोरी) येथील डॉ. देशमुख यांच्या शेतात जाऊन यासंबंधी पाहणी केली. या शेतीमध्ये सध्या २६५ जातीच्या आणि ८६०३२ जातीच्या ऊसाची लागवड केलेली आहे. या ऊस पिकाची व जमिनीची पाहणी करून या शिष्टमंडळाने उपयुक्त मार्गदर्शन केले.

Dr. Ashish Deshmukh
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात काय म्हणाले डॉ. आशिष देशमुख ?

शिष्टमंडळात वसंतदादा शुगर इंस्टीट्युट, पुणेचे महासंचालक तथा माजी कृषी प्रधान सचिव महाराष्ट्र शासन शिवाजीराव देशमुख, कृषी क्षेत्र व्यवस्थापक श्री. कटके, प्रशासकीय व्यवस्थापक पाटील, स्थापत्य अभियंता जगताप, कृषी अभियंता शिंदे, पूर्ती साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी समय बनसोड, मुख्य व्यवस्थापक आकाश जांभूळकर, ऊस निरीक्षक प्रदीप ठाकरे, ऊस तज्ञ राजेश भगल प्रामुख्याने उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com