धानोरकर दाम्पत्याने अखेर जिल्हा बॅंकेची नोकर भरती थांबवलीच...

कॉँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांनी लोकसभेत तर त्यांच्या पत्नीवरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी विधानसभेत आवाज उचलला होता.
Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
Balu Dhanorkar and Pratibha DhanorkarSarkarnama

चंद्रपूर : राज्य शासनाच्या सहकार खात्याने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला ३६० पदांच्या नोकर भरतीला मंजुरी दिली होती. परंतु याआधीचे दोन नोकर भरती प्रकरण वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे ही नोकरभरती होऊ नये, यासाठी कॉँग्रेसचे (Congress) चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी लोकसभेत तर त्यांच्या पत्नीवरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत आवाज उचलला होता.

बॅंकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. बॅंकेत अनेक आर्थिक घोटाळे झाले आहे. त्यामुळे नोकर भरतीला स्थगिती देऊन या घोटाळ्यांची सीबीआय (CBI) चौकशी करावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी उचलून धरली होती. आता विशेष कार्यकारी अधिकारी व सहनिबंधक महाराष्ट्र शासन यांनी या भरतीला स्थगिती दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीसोबतच गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील बँकांचादेखील समावेश आहे. धानोरकर दाम्पत्याने नोकर भरती थांबवून घोटाळ्यांना चाप लावल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ सन २०१२ ते २०१७ पर्यंत होता. या काळात दोन वेळा नोकरी भरती करण्यात आली. ही नोकर भरती वादग्रस्त ठरली आहे. या मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झाल्याची आरोप भरती प्रक्रियेदरम्यान झाला आहे. तसेच या काळात बॅंक अनेक घोटाळ्यांनी गाजली. एका अध्यक्षाला तुरुंगात जावे लागले. ही शेतकऱ्यांची बॅंक आहे. परंतु शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी काही संचालक आपले हितसंबंध जोपासत आहेत. संचालक मंडळाचा कार्यकाळ आधीच संपला आहे.

Balu Dhanorkar and Pratibha Dhanorkar
आमदार धानोरकर म्हणाल्या; जिल्हा बॅंकेचा व्यवस्थापक ४२० आहे, चौकशी करा...

सर्वोच्च न्यायालयाने जून २०२१ रोजी दिलेल्या आदेशात कार्यकाळ संपलेल्या बॅंकांवर प्रशासक नियुक्त करून निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहे. परंतु चंद्रपूर मध्यवर्ती बॅंकेवर अद्याप प्रशासक नियुक्त झाला नाही, याकडे खासदार धानोरकरांनी लोकसभेचे लक्ष वेधले होते. याउलट सहकार खात्याने ३६० जणांच्या नोकर भरतीला मान्यता देऊन घोटाळ्यांना खतपाणी घालण्याचे काम केले. याशिवाय बॅंकेचे मुख्याधिकाऱ्यांवर यापूर्वीच बॅंकेतील घोटाळा प्रकरणात दोन फौजदारी खटले दाखल आहेत. अशा व्यक्तीला जनरल मॅनेजर पदावर घेऊ नये, असे रिजर्व बॅंक, नाबार्ड, सहकार विभागाचे निर्देश आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून बॅंकेच्या विद्यमान संचालक मंडळाने त्यांना मुदत वाढ दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार विभागाने आज दिलेल्या आदेशानुसार नोकरभरतीला स्थगिती दिली आहे.

चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया उच्च न्यायालयात दाखल असलेल्या विविध याचिकांमुळे प्रलंबित आहेत. यास्तव बँकांच्या संचालक मंडळांची निवडणूक जलद गतीने पूर्ण करण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकांबाबत सुनावणी प्रलंबित आहे. शासकीय वकिलामार्फत न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरण ताबडतोब निकालात काढण्याच्या निर्देश विशेष कार्य अधिकारी श्रीकृष्ण वाडेकर यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र शासन पुणे यांना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com