मुलांना दारूचे व्यसन लावण्यासाठी हा खटाटोप : अभय बंग यांचे तरी सरकार ऐकणार का?

माणसांना बेलगाम करणारे पेय (Wine) व्यापक करण्यासाठी तुम्ही (Mahavikas Aghadi) प्रयत्न करता. त्यामुळे शासन कशासाठी चालतं आणि चालवलं जातं हा मोठा प्रश्‍न आहे, असे डॉ. अभय बंग (Abhay Bang) म्हणाले.
Abhay band on wine
Abhay band on wineSarkarnama

नागपूर : राज्य सरकारने हा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वप्रथम मला किळस आली. काही काळापूर्वी मी एक लेख लिहीला होता, त्यामध्ये महाराष्ट्राला एक शब्द उपरोधाने वापरला होता, तो म्हणजे हे ‘महाराष्ट्र आहे की मद्यराष्ट्र आहे?’ मी जे उपरोधाने म्हणालो होतो, ते आज वास्तवात आणण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने (State Government)आखला आहे. कोरोनाची (Corona) साथ सुरू आहे आणि माणसं बेलगाम वागू नये, त्यांना मर्यादेत राहावं, म्हणून वेगवेगळी बंधन आणता आणि दुसरीकडे माणसांना बेलगाम करणारे पेय व्यापक करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. त्यामुळे शासन कशासाठी चालतं आणि चालवलं जातं हा मोठा प्रश्‍न आहे, असे डॉ. अभय बंग (Dr. Abhay Bang) यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत मत व्यक्त केले.

नाशिक, (Nashik) अहमदनगर (Ahamadnagar) आणि बारामतीवाल्यांसाठीच (Baramati) झाला हा निर्णय झाला असल्याचेही ते म्हणाले. दारू ही शरीरासाठी अपायकारत आहे, हे वाक्य जगमान्य झालेलं आहे. हे वाक्य विज्ञानाचा पुरावा म्हणून मान्य केलं, तर मग त्याची विक्री, खप वाढवण्याचा प्रयत्न कोणतेही शासन कसे काय करू शकते? भारतातली दारू न पिणारी स्त्री आणि किशोरवयीन मुलं, मुली दारू कंपन्यांच्या स्ट्रॅटिजीनुसार हे अनटॅप्ड मार्केट आहे. त्यामुळे भारतीय बाई दारू कशी पित नाही, मग तिला आता प्यायला लावायची, किशोरवयीन मुलामुलींना प्यायला लावायची, असा हा प्रयत्न आहे. वाईनमध्ये ४ ते ६ टक्के अल्कोहोल असते. विदेशामध्ये वाईन हे स्त्रियांचं पेय मानलं जातं. त्यामुळे वाईन लोकप्रिय करण्यासाठी राज्य सरकारचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे, असे डॉं. बंग म्हणाले.

जो आधी ४ टक्के अल्कोहोल असलेलं पेय पितो, तो पुढे जाऊन ६ टक्के अल्कोहोल असलेलंही पेय पितो. मग १५ टक्क्यांचंही आणि ५० टक्क्यांचंही पितो. दारू हा प्रकारच असा आहे की, त्याचं व्यसन वाढत जातं. त्याची सुरूवात म्हणून महिला आणि कोशोरवयीन मुलामुलींमध्ये त्याची लोकप्रियता वाढविण्याचा सरकारचा प्रयत्नाची किळस येते. वाईन ही दारू नसून फळांचा रस आहे, असे समर्थन महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या नेत्यांनी केलं आहे. त्यांची नावं मी येथे घेणार नाही. घरातल्या बाळाला वाईन पाजाल का, घरातील देव्हाऱ्यातील देवांवर दारूचा अभिषेक कराल का आणि दुर्देवानं असा प्रसंग आला की तुमची आई मरणासन्न अवस्थेत आहे, तर तिच्या तोंडात गंगाजलच्या ऐवजी वाईन टाकाल का, असे ३ प्रश्‍न डॉ. अभय बंग यांनी विचारले आहेत.

Abhay band on wine
किराणा दुकानातून वाईन विकणार असाल, तर मग गांजाच्या शेतीलाही परवानगी द्या..

वाईनमध्ये अल्कोहोल आहे आणि ती तुम्ही व्यापक करू इच्छिता, हे वाईट आहे. किराणा दुकानांत वाईन उपलब्ध करून देण्यामागे अर्थव्यवस्था बळकट करण्याचा प्रयत्न आहे, सेही सांगितले जात आहे. पण अर्थव्यवस्थेचा असा तुकड्यातुकड्यांत विचार करता येत नाही. पूर्ण समाजव्यवस्थेचा आणि अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागतो. दारू विकतो एक, पितो दुसरा आणि नुकसान तिसऱ्याचं होतं. जेव्हा असं होतं तेव्हा ते थांबवावं लागतं. अर्थव्यवस्थेला फायदा होतो, हे तुम्ही कशाने मोजता, त्यावर सर्व निर्भर आहे. उत्पन्न वाढीसाठी असा कृत्रिम प्रयत्न करणे चुकीचे आहे, असेही डॉ. बंग म्हणाले.

शेतकऱ्यांची उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला, असे सरकारचं म्हणणं धादांत खोटं आहे. कारण सरसरकट सर्व शेतकरी फळांचं उत्पादन घेत नाही. हा नाशीक, अहमदनगर आणि बारामती या तीन ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या द्राक्षांचा हा प्रश्‍न आहे. त्यांच्यासाठीच हा सर्व खटाटोप चाललेला असावा, असे वाटते. ढोबळमानाने महाराष्ट्रातले २ कोटी लोक दारू पितात. म्हणजेच इतर १० कोटी लोक पित नाहीत. या १० कोटींमध्ये महिला, मुले, मुली आणि म्हातारे लोक आहे आणि जवळपास ५० टक्के लोक दारू पित नाहीत. त्यामुळे या लोकांनी दारू प्यावी, यासाठी चालवलेला हा एक प्रयत्न आहे, असल्याचा घणाघाती आरोप डॉ. अभय बंग यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com