Bawankule : फडणवीसांवर टीका करण्यापूर्वी अंधारेंनी आपली उंची तपासावी !

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी केलेले अफाट कार्य, त्यांचे राज्याच्या विकासाचे व्हिजन, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचे उत्तुंग नेतृत्व याचा विचार करावा. तसेच आपली राजकीय उंची किती याचाही विचार करावा, असा टोला बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) हाणला.
Chadrashekhar Bawankule
Chadrashekhar BawankuleSarkarnama

नागपूर : महविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे सत्तेच्या काळात काहीच काम केले नाही आणि आता भारतीय जनता पार्टी आणि बाळासाहेबांची शिवसेना युती सरकार काम करत असताना आघाडीतील घटक पक्ष खोटा नॅरेटीव्ह चालवून जाणीवपूर्वक चुकीची माहिती पेरत आहेत व युती सरकारची प्रतिमा खराब करत आहेत, असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. खोटे सांगाल तर भाजपची संघटना रस्त्यावर उतरून विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला.

ठाणे (Thane) जिल्ह्याच्या संघटनात्मक प्रवासाच्या अंतर्गत भिवंडी येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, भाजप ठाणे विभाग संघटनमंत्री हेमंत म्हात्रे, भाजप (BJP) भिवंडी जिल्हाध्यक्ष संतोष शेट्टी आणि आमदार महेश चौघुले उपस्थित होते. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanis) यांच्यावर टीका करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यासाठी केलेले अफाट कार्य, त्यांचे राज्याच्या विकासाचे व्हिजन, त्यांनी केलेला त्याग आणि त्यांचे उत्तुंग नेतृत्व याचा विचार करावा. तसेच आपली राजकीय उंची किती याचाही विचार करावा, असा टोला बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) हाणला.

आमदार बावनकुळे म्हणाले की, सत्ता गमावल्यानंतर आघाडीतील घटक पक्ष सातत्याने चुकीची माहिती पेरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. युती सरकारचे जाणीवपूर्वक नुकसान करून प्रतिमा खराब करत आहेत. पण भारतीय जनता पार्टीने आता कंबर कसली आहे. खोटे सांगाल तर भाजपची संघटना रस्त्यावर उतरून खोट्याचा विरोध करेल. महाविकास आघाडी सरकारने गेल्या अडीच वर्षात राज्याला बरबाद केले, त्याबद्दलचे सत्य जनतेसमोर सांगू.

Chadrashekhar Bawankule
बावनकुळे म्हणाले, ...म्हणून पेंग्वीन सेना घेऊन ते 'टीव टीव' करीत आहेत; केजरीवालांवरही टिका !

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरानंतर युती सरकार कोसळेल, असे भाकीत त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वर्तविले आहे, त्याविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता आमदार बावनकुळे यांनी सांगितले की, केवळ भाजपला दूर ठेवण्यासाठी आणि सत्ता मिळवून भ्रष्टाचार करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकत्र आले होते. आता त्यांना ध्यानात आले आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडे भक्कम बहुमत आहे. हे सरकार अधिकाधिक काम करेल, तसतसा या पक्षांमध्ये असंतोष उफाळून येईल. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना थांबविण्यासाठी आणि आमदारांची अस्वस्थता कमी करण्यासाठी जयंत पाटील यांनी हे विधान केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in