Buldana जिल्ह्यात सरपंचांनी घेतलेल्या सोयीच्या भूमिका, सर्वसामान्यांचा विकास करणार का?

Mahavikas Aghadi : दोन्ही घटकांच्या तोडीस तोड जागा निवडून आल्या असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.
Buldana
BuldanaSarkarnama

जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आमचीच सरशी झाली असल्याचे दावे महाविकास आघाडी व भाजप आणि शिवसेनेचा शिंदे गट करीत आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये राजकीय पक्षाचा थेट संबंध नसला तरी दोन्ही घटकांच्या तोडीस तोड जागा निवडून आल्या असल्याचे वास्तव नाकारता येणार नाही.

बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील तेरा तालुक्यांमधील 279 ग्रामपंचायतींची निवडणूक (Election) पार पडली. या निवडणुकीच्या माध्यमातून 2325 सदस्य निवडून दिले गेले. विशेष बाब म्हणजे यांपैकी 731 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत, तर 21 ग्रामपंचायतींचे सरपंच (Sarpanch) देखील बिनविरोध झालेले आहेत. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व राज्यातील सत्ताधारी शिंदे गट दोनशे पेक्षा अधिक सरपंच आमचे असल्याचे दावे करीत आहेत. जिल्ह्यातील १७ ग्रामपंचायती पूर्णतः बिनविरोध निवडून आल्या.

निवडणुकीत प्रयत्न करताना फारसा कोणी नेता दिसला नाही. मात्र निवडून आल्यावर गुलाल उधळल्यानंतर गुलालावर हक्क सांगण्यासाठी एकमेकांची स्पर्धाच लागली आहे. वास्तविक पाहता देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा नेहमीप्रमाणे राहिला. चिखली व बुलढाण्यामध्ये तोडीस तोड लढती झाल्या. लोणार व मेहकरमध्ये शिंदे गट व काँग्रेसने बाजी मारली. मोताळा, मलकापूर व जळगाव जामोदमध्येही आघाडी आणि भाजप व शिंदे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली.

Buldana
Akola जिल्ह्याची राजकीय दिशा ठरविणारी निवडणूक, ‘वंचित’ने मतदार जोडला...

वास्तव काहीही असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी यांनी आम्ही महाविकास आघाडी मिळून 200 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवल्याचे म्हटले आहे, तर खासदार प्रतापराव जाधव यांनीदेखील 200 प्लस ग्रामपंचायत आमच्या ताब्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणूस व मतदारही संदर्भात पडला आहे. सरपंच कोणाचेही होवोत, परंतु आमच्या गावामध्ये विकास कामे झाली पाहिजेत. हीच सर्वसामान्य मतदारांची अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com