मुख्यमंत्र्यांना तेव्हा म्हणायचे होते की, दुसरा मोठा प्रकल्पही आम्ही गुजरातला नेऊ !

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते प्रशांत पवार, संतोष सिंग, यादव मस्के, सुमन रेवतकर, श्रीकांत बोबडे, शैलेश तिवारी, शैलेश पांडे, महेंद्र भांगे, राजेश माटे, सुखदेव वंजारी आदी उपस्थित होते.
Duneshwar Pethe, Prashant Pawar NCP
Duneshwar Pethe, Prashant Pawar NCPSarkarnama

नागपूर : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्यावतीने ४ आणी ५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन - वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थिती संदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणी राष्ट्र तसेच समाजाबदलची बांधीलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) नेते प्रशांत पवार, संतोष सिंग, यादव मस्के, सुमन रेवतकर, श्रीकांत बोबडे, शैलेश तिवारी, शैलेश पांडे, महेंद्र भांगे, राजेश माटे, सुखदेव वंजारी आदी उपस्थित होते. आधी वेदांता फॉक्सकॉन आणि आता टाटा एअरबस हे प्रकल्प एकापाठोपाठ गुजरातला पळवण्यात आले आहेत. जेव्हा वेदांता प्रकल्प नेला, तेव्हा ‘यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रासाठी (Maharashtra) आणणार आहो’, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले होते. पण आत्ताची घडामोड पाहता ‘यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला (Gujrat) नेणार आहो’, असे तर मुख्यमंत्र्यांना म्हणायचे नव्हते ना, असा प्रश्‍न करीत पेठेंनी सत्ताधाऱ्यांना असा टोला लगावला.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन : वेध भविष्याचा’ या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. कोरोनाच्या संकटकाळात अनेक राज्यांमध्ये हाहाकार माजला असताना या संकटातून राज्याला बाहेर काढण्यामध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसने प्रमुख भूमिका बजावली. आव्हानात्मक परिस्थितीतही आर्थिक आघाडीवर राज्य अग्रेसर ठेवण्यामध्ये पक्षनेतृत्वाची भूमिका महत्वाची होती. पक्षाच्या अंतर्गत काम करणाऱ्या विविध संघटनांनी वेळोवेळी आपली भूमिका उत्तमपणे पार पाडली.

२०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांच्या कारभारामुळे देशापुढे अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या या देशातील काही समाजघटकांना सतत भितीच्या छायेखाली ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत. समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच विद्वेष निर्माण करण्याचे काम सत्तेच्या माध्यमातून केले जात आहे. घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण करण्याची मोहीम राबवली जात आहे. २०१४ पूर्वी रुपयाच्या घसरणीचा ठपका तत्कालीन पंतप्रधानांवर ठेवणारे लोक आता रुपयाच्या अभूतपूर्व घसरणीचेही लंगडे समर्थन करू लागले आहेत.

Duneshwar Pethe, Prashant Pawar NCP
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव : रोहित पवारांचा खळबळजनक आरोप!

देशासमोर, राज्यासमोर अनेक प्रश्न असताना व्हाट्सप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करून लोकांना संभ्रमित करण्याचे प्रयत्न सत्ताधा-यांकडून केले जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध प्रश्नासंदर्भातील नेमके वास्तव काय आहे, त्या संदर्भातील नेमकी आव्हाने कोणती आहेत आणि त्यांना सामोरे कसे जाता येईल, या संदर्भातील मंथन शिबिरामध्ये करण्यात येणार आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबरच विविध क्षेत्रांतील अभ्यासक, विचारवंत, पत्रकार विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. दोन दिवसांचे हे शिबिर पक्षाच्या निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी असल्याचे दुनेश्‍वर पेठे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in