मुख्यमंत्री म्हणाले, ठाण्याचं काम फास्ट असतं; फडणवीसांनी केले कौतुक...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कालच्या काल गडचिरोली गाठले आणि प्रशासनाला आवश्‍यक सूचना व आदेश दिले.
Devendra Fadanvis and Eknath Shinde
Devendra Fadanvis and Eknath ShindeSarkarnama

नागपूर : गेल्या पाच दिवसांपासून गडचिरोलीत पावसाची संततधार सुरू असल्याने पूरपरिस्थिती उद्भवली. याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी कालच्या काल गडचिरोली गाठले आणि प्रशासनाला आवश्‍यक सूचना व आदेश दिले.

दर पावसाळ्यात गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील जवळपास ११२ गावांचा संपर्क तुटतो. त्यावर थातूर मातूर उपाययोजना केल्या जातात. पण आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) अधिकाऱ्यांना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेतून वनविभागाच्या अधिकाऱ्याला कॉल केला. आलापल्ली-सिरोंचा रस्त्याचे काम २०२१पासून तुमच्याकडे पेंडींग आहे. तुम्ही स्वतः तेथे जा आणि ते काम करून द्या. कारण आम्ही सांगतो की रस्ते दुरुस्त करा, गावांना जोडणार नवीन रस्ते बनवा. पण या लोकांना तुमच्या वनविभागाकडून अडचणी येतात, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

ठाण्याचं काम फास्ट असतं..

मुख्यमंत्री शिंदे संबंधित अधिकाऱ्याला सूचना देत असताना त्या अधिकाऱ्याने सांगितले की, साहेब मी ठाण्यातसुद्धा काम केले आहे. त्यावर ठाण्याचं काम फास्ट असतं, असे मुख्यमंत्री त्यांना म्हणाले. त्यानंतर तेथे हंशा पिकला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हसू लपवू शकले नाहीत. तुमच्याकडे पेंडींग असलेली कामे तात्काळ प्रभावाने मार्गी लावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. वनविभागाच्या परवानगीअभावी ज्या रस्त्यांची कामे अडलेली आहेत, त्या कामांनासुद्धा परवानग्या देऊन टाका, असेही त्यांनी सुचविले.

Devendra Fadanvis and Eknath Shinde
संजय शिरसाठ म्हणाले, `आता फक्त एकनाथ शिंदे हेच नेते`

मुख्यमंत्री जमिनीवर काम करणारे नेते..

पूरपरिस्थिती असल्यामुळे आपण तात्काळ गडचिरोलीला गेलं पाहिजे, असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. म्हणून आम्ही तातडीने गडचिरोली गाठले. प्रशासनाला येथे पूर्ण सज्ज केले आहे. ११२ गावांचा संपर्क दरवर्षी पावसाळ्यात तुटतो, त्याचा कायमस्वरूपी उपाय आता केला पाहिजे. अशा परिस्थितीत गर्भवती महिलांचा प्रश्‍न गंभीर असतो, त्यावरही उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. येथे मेडिकल कॉलेजचा ज्वलंत प्रश्‍न होता, त्याचीही घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जमिनीवर काम करणारे आहेत. २४ बाय ७ करणारे असल्यामुळे त्याचा फायदा नक्कीच महाराष्ट्राला होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in