पूरपरिस्थितीत मुख्यमंत्र्यांना सर्वप्रथम आठवण झाली ती ‘या’ जिल्ह्याची...

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, गडचिरोलीत पूरग्रस्त परिस्थिती असल्याने पाहणी करणार आहोत.
Eknath Shinde and Devendra Fadanvis
Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama

नागपूर : गेल्या चार दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवली आहे. मोठे नुकसान होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती मिळताच गडचिरोलीकडे कूच केली. सध्या ते गडचिरोलीत पोहोचले असल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा (Devendra Fadanvis) आहेत.

नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) विशेष विमानाने आल्यानंतर हेलिकॉप्टरने ते गडचिरोलीला जाणार होते. पण खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे रस्ते मार्गाने गडचिरोली जवळ केले. नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, गडचिरोलीत पूरग्रस्त परिस्थिती असल्याने पाहणी करणार आहोत. अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असून प्रशासकीय यंत्रणा अलर्ट आहे. कुठेही मालमत्ता आणि जीवित हानी होणार नाही, यासाठी अलर्ट आहोत, राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांना स्थलांतर करण्यासाठी सूचना दिल्या असून राज्यातील इतर भागांतही विशेष सूचना दिल्या आहेत. पूरपरिस्थितीबाबत स्टेट डिझास्टर डिपार्टमेंट, मिल्ट्री, एनडीआरएस सर्वांशी चर्चा झाली आहे, त्यांना अलर्ट केलं आहे.

विभागीय आयुक्त माधवी खोडे -चवरे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सूर्यवंशी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर ,पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी विमानतळावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. विभागीय आयुक्त माधवी खोडे चवरे यांनी त्यांना विमानतळावर पूर्व विदर्भातील पूर परिस्थितीचा आढावा दिला. त्यानंतर खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर ऐवजी रस्ते मार्गाने त्यांनी गडचिरोलीकडे प्रयाण केले.

Eknath Shinde and Devendra Fadanvis
एकनाथ शिंदे गटाचे पंढरपुरात शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर एकनाथ शिंदे आज प्रथमच गडचिरोलीत आले. त्यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गेले चार दिवस सुरू असलेल्या पावसामुळे दक्षिण गडचिरोलीला मोठा फटका बसलाय. या भागातील नदी नाले तुडुंब वाहत असल्याने काही मार्गही बंद झाले आहेत. याशिवाय मेडीगट्टा आणि गोसीखुर्द या धरणांच्या पाणी विसर्गामुळे जिल्ह्याच्या काही भागांत पूरस्थिती निर्माण झाल्याची अवस्था आहे. या सर्वांचा आढावा घेण्यासाठी व प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोलीत दाखल झाले आहेत.

गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातल्या नियोजन भवनात उच्चस्तरीय आढावा बैठकीत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. ते काही ठिकाणी स्वतः पूरपरिस्थिती बघण्यासाठी जाण्याचीही शक्यता आहे. प्रशासनाने नियोजन भवन परिसरात रंगीत तालीम घेत मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते दिशानिर्देश देतात, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in