मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या भूमिकेचं कौतुक केलं !

आमदारांना खरेदी विक्री करण्याची ताकद कुणामध्ये आहे का, असा सवाल आमदार जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्या भूमिकेचं कौतुक केलं !
MLA Kishor Jorgewar, Uddhav Thackeray and Ajit PawarSarkarnama

मुंबई : विधानसभेचे सदस्य हे लोकांमधून निवडून येतात. एक नेतृत्व उभं राहायला अनेक वर्षे जातात. त्यामुळे त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणं योग्य नाही. अपक्ष आमदारांचा घोडेबाजार म्हणण्यावर मी आक्षेप घेतला आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनीसुद्धा माझ्या भूमिकेचं कौतुक केलं, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले अपक्ष आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

आमदारांना खरेदी विक्री करण्याची ताकद कुणामध्ये आहे का, असा सवालही आमदार जोरगेवार (MLK Kishor Jorgewar) यांनी उपस्थित केला. काल संध्याकाळी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची (Chief Minister Uddhav Thackeray) भेट घेतली. तेव्हा खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) देखील उपस्थित होते. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवारांना निवडून देण्यासाठी सहकार्य करा, असे मुख्यमंत्री म्हटल्याचेही ते म्हणाले. कालच्या बैठकीत काही शिवसेनेचे आमदार आणि काही अपक्ष आमदार होते. पण मला काही सूचना तशा दिल्या नाहीत, असे त्यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले.

आज माझी काही मंत्र्यालयात काम आहेत, ती आधी पूर्ण करणार आहे. रखडलेल्या कामांचा लोकप्रतिनिधींना मोठा त्रास होतो. अनेक आमदारांना या अडचणी येतात. कामे वेगाने झाली पाहिजे. माझ्यासह अनेक सदस्यांची तशी भावना आहे. सभागृहात जाणाऱ्या सदस्यांसाठी प्रशिक्षणाबाबत आमदार जोरगेवार म्हणाले, सभागृहात जाणाऱ्या सदस्याला वेगळ्या प्रशिक्षणाची गरजच काय आहे. आता यापुढे निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होईल. अपक्ष आमदार म्हणून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क केला का, असे विचारले असता त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.

MLA Kishor Jorgewar, Uddhav Thackeray and Ajit Pawar
आमदार जोरगेवार संतापले अन् म्हणाले, अध्यक्ष महोदय त्यांना जरा सांगा...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल चंद्रपूरचा दौरा केला. त्यांच्याबाबत बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले, सुप्रिया सुळे माझ्या आईला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा साधेपणा बघून आम्ही सगळे त्यांच्या प्रेमात पडलो. कर्तृत्ववान महिला आणि तिचा वसा समोर नेणारा कार्यक्षम मुलगा हे नातं खूप महत्वाचं आहे. अम्माने शून्यातून विश्व निर्माण केलं. तेच विचार आणि संस्कार घेऊन किशोर जोरगेवार यांनी सुरू केलेला अम्माचा टिफिन हा उपक्रम अप्रतिम आहे. अम्माच्या भेटीला आलेली मी आज त्यांचे हे काम पाहून त्यांच्या प्रेमात पडली, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी अम्माचे आणि पर्यायाने अम्माचा टिफिन या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in