हुकमी एक्का असताना मेघेंवर जबाबदारी सोपविल्याने बसला भाजपला फटका…

अनिल देशमुख Anil Deshmukh यांच्या अनुपस्थितीचा राष्ट्रवादीला NCP चांगलाच फटका बसला आहे. राष्ट्रवादीचे चार पैकी दोन उमेदवार पराभूत झाले आहेत.
हुकमी एक्का असताना मेघेंवर जबाबदारी सोपविल्याने बसला भाजपला फटका…
chandrashekhar Bawankule former ministerSarkarnama

नागपूर : ग्रामीण भागात पकड असलेला हुकमी एक्का जवळ असताना बावनकुळे यांच्याऐवजी आमदार समीर मेघे यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी भाजपने सोपवली होती. भाजपतील अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपच्या उमेदवारांना बसल्याचे दिसून येते. आमदार मेघे यांच्या हिंगणा विधानसभा संघातही भाजपचे माजी सदस्य राजेंद्र हरडे पराभूत झाले आहेत. बावनकुळे यांना डावलून आमदार मेघेंवर जबाबदारी सोपविल्यामुळेच भाजपला फटका बसल्याचे जाणकार सांगत आहेत.

शिवसेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात ५ उमेदवार स्वबळावर उभे केले होते. मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. मात्र बोथिया पालोरा सर्कल मध्ये कॉंग्रेसचे उमेदवार माजी सदस्य कैलाश राऊत यांना याचा फटका बसला. ते पराभूत झाले आहेत. नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांवर घेण्यात आलेल्या पोट निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचे ११ उमेदवार निवडून आले. यात काँग्रेसला दोन जागांचा फायदाही झाला आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी जिल्ह्यावर आपली राजकीय पकड अधिक मजबूत केली आहे.

अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीचा राष्ट्रवादीला चांगलाच फटका बसला आहे. राष्ट्रवादीचे चार पैकी दोन उमेदवार पराभूत झाले आहेत. यात देशमुख यांच्या काटोल-नरखेड विधान सभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी गटनेते शेखर कोल्हे यांच्या पत्नी संगीता कोल्हे आणि सावरगाव मतदार संघात सलील देशमुख यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या जागेवर राष्ट्रवादी पराभूत झाली. कोल्हे यांना भाजपच्या मीनाक्षी सरोदे यांनी धूळ चारली. सावरगाव सर्कल मध्ये माजी आमदार सुनील शिंदे यांच्या स्नुषा माजी सभापती सतीश शिंदे यांच्या पत्नीने बंडखोरी केली होती. राष्ट्रवादीच्या भांडणाचा भाजपच्या पार्वती काळबांडे यांना चांगलाच फायदा झाला.

विशेष म्हणजे याच भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारात काँग्रेसचे महासचिव आणि माजी आमदार आशिष देशमुख सहभागी झाले होते. यामुळे काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. दुसरीकडे माजी ऊर्जामंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक जिल्हा परिषदेचे भाजपचे माजी गटनेते अनिल निधान यांनाही प्रभावाला सामोरे जावे लागले. भाजपतील अंतर्गत धुसफुशीचा निधान बळी ठरले. विशेष म्हणजे त्यांना भाजपने बी फॉर्म दिला नव्हता, उमेदवारी दाखल केल्यावर त्यांना भाजपच्या नेत्यांनी आमचे उमेदवार म्हणून समर्थन जाहीर केले होते. त्यामुळे निदान यांना कमळाशिवाय निवडणूक लढावी लागली.

chandrashekhar Bawankule former minister
आता महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दहा हजारांचे अनुदान द्यावे : चंद्रशेखर बावनकुळे

काँग्रेस ९ विजयी (२ जागांचा फायदा)

भाजप ४ विजयी ( १ जागांचे नुकसान)

राष्ट्रवादी २ विजयी (२ जागांचे नुकसान)

शेकाप १ विजयी

गोंडवाना गणतंत्र पार्टी १ विजयी

Related Stories

No stories found.