Amravati News: रणजीत पाटलांचा वारू लिंगाडे रोखणार का? मतमोजणीस प्रारंभ...

Graduate Election Result: ‘मॅजिक फिगर’ गाठण्यास पहिल्या पसंतीची मते न मिळाल्यास बाद फेरीचा आधार घ्यावा लागणार आहे.
Ranjeet Patil and Dhiraj Lingade
Ranjeet Patil and Dhiraj LingadeSarkarnama

Amravati Division Graduate Constituency : पाच जिल्ह्यांत विखुरलेल्या अमरावती (Amravati) विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आज सकाळी ७ वाजतापासून मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. बॅलेट बॉक्स काढून गठ्ठे केल्यानंतर दुपारी २ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला (Counting) सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ५ वाजेपर्यंत कल हाती येण्याची शक्यता आहे.

मतमोजणीमध्ये उमेदवाराला विजयासाठी ‘मॅजिक फिगर’ गाठण्यास पहिल्या पसंतीची मते न मिळाल्यास बाद फेरीचा आधार घ्यावा लागणार आहे. ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने मतमोजणी व त्यानंतर निकाल जाहीर होण्यास उशीर लागेल. या निवडणुकीत (Election) २३ उमेदवार रिंगणात असल्याने चुरशीच्या लढतीमध्ये भाजपचे डॉ. रणजीत पाटील विजयाची हॅटट्रिक मारतात का? की लिंगाडे पाटलांचा वारू रोखण्यात यशस्वी होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आज सकाळी ७ वाजतापासून बडनेरा येथील नेमाणी गोदामामध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मतमोजणीसाठी २८ टेबल लावण्यात आलेले आहेत. या टेबलांवर प्रत्येकी एक हजार मतपत्रिका मोजणीसाठी देण्यात येणार आहेत. म्हणजेच एका फेरीमध्ये २८ हजार मते मोजली जातील. या सर्व मतपत्रिका पिजन होलमध्ये ठेवल्या जातील. अशा पद्धतीने विजयाचा कोटा पूर्ण होईपर्यंत प्रक्रिया सुरू राहील.

वैध मतांमध्ये विजयाचा कोटा पूर्ण न झाल्यास ज्या उमेदवाराला सर्वांत कमी मते मिळाली, त्याला बाद करण्यात येईल व त्याच्या मतपत्रिकेवरील दुसऱ्या क्रमांकाची मते मोजली जाणार आहेत. विजयी मतांचा कोटा पूर्ण होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. मतमोजणीसाठी पाचही जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व इतरांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ranjeet Patil and Dhiraj Lingade
Legislative Council Elections : जयंत पाटलांचे मोठे विधान : ‘पदवीधर-शिक्षक’च्या निवडणुकीत पैशाचा वापर

मतदारांमध्ये चर्चा..

या मतदारसंघात सलग दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील, कॉंग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीचे प्रा. अनिल अमलकार, शरद झांबरे, काँग्रेसचे बंडखोर श्याम प्रजापती, अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्यासह २३ उमेदवारांनी भविष्य अजमावल्याने त्यांच्यापैकी कोण विजयी होते व कोणता उमेदवार कोणाच्या विजयाची गणित बिघडवते, हे आज कळणार आहे.

घटलेल्या मतदानाचा फायदा कुणाला?

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मतदानाच्या दिवशी पाचही जिल्ह्यात संथ गतीने मतदान झाले. त्यामुळे एकूण केवळ ४९.६७ टक्केच मतदान होऊ शकले. अकोला तर केवळ जिल्ह्यात ४६.९१ टक्के मतदान झाले. निवडणुकीत मतदान घटल्याने त्याचा फायदा दोन वेळचे विजयी उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांना होतो की त्यांच्या विजयाचे गणित बिघडते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कॉंग्रेसचे धीरज लिंगाडेसुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार असल्याने त्यांना तीन राजकीय पक्षाच्या मतदारांचे बळ मिळाल्याने त्यांचे पारडेसुद्धा जड असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com