Uddhav Thackeray : ...म्हणूनच उद्धव ठाकरे आज सत्तेबाहेर; आशिष जयस्वालांनी सगळंच सांगितलं

Ashish Jaishwal : ठाकरे यांनी सर्वच निर्णय चुकीचे घेतले
Uddhav Thackeray, Ashish Jaiswal
Uddhav Thackeray, Ashish JaiswalSarkarnama

Thackeray vs Shinde Group : एखादे संकट आल्यानंतर सहकाऱ्यांशी चर्चा करणे, अनुभवी लोकांचा सल्ला घेणे गरजेचे असते. ठाकरे यांनी मात्र चुकीचे निर्णय घेतले. गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावरील कारवाई, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना कायदेशीर सल्ला घेतला नाही. चुकीच्या माणसांचे सल्ले ऐकून ठाकरे यांनी निर्णय घेतले. दरम्यान, अनैसर्गिक आघाडी केल्यानेच आज उद्धव ठाकरे सत्तेबाहेर आहेत, असा दावा शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार आशिष जयस्वाल यांनी केला.

Uddhav Thackeray, Ashish Jaiswal
Cabinet Expansion : एकनाथ शिंदेंचं सरकार बचावल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संजय शिरसाट म्हणाले...

आमदार जयस्वाल (Ashish Jaiswal) म्हणाले, ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्यासाठी नैसर्गिक युती तोडून महाविकास आघाडीत (MVA) सहभागी झाले. ही आघाडी अनैसर्गिक आहे. यातून बाहेर पडू, असे वारंवार सांगत होते. अगदी गुवाहटीला जाण्यापूर्वीही आम्ही काहीजण वर्षा बंगल्यावर जाऊन भेटलो. त्यांना महाविकास आघडीतून बाहेर पडल्यासाठी विनंती केली. त्यांनी मात्र ऐकले नाही. त्यांच्या सल्लागारांनी कुठल्याही स्थितीत आघाडीतून बाहेर पडायचे नाही, असे सांगत होते.

Uddhav Thackeray, Ashish Jaiswal
Supreme Court Live : गोगावलेंबरोबरच न्यायालयाने गटनेते म्हणून शिंदेंचीही नियुक्ती बेकायदेशीर ठरवली; पुढे काय? निकालपत्रात महत्त्वाची अपडेट

'गलत कदम और सल्तनत खतम'

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आमदार अनिल परब आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सल्ले देतात. त्यांच्या चुकीच्या सल्ल्यांमुळेच ठाकरेंचे सर्व निर्णय चुकले आहेत. भाजपसोबतची युती तोडून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. हा निर्णय शिवसेनेतील अनेकांना पटला नव्हता. त्याबाबत आम्ही अनेक आमदारांनी ठाकरे यांना वारंवार माहिती दिली, मात्र त्यांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले. त्याच्या याच निर्णयामुळे ठाकरे यांच्यावर आज ही वेळ आली आहे, असेही आमदार जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

Uddhav Thackeray, Ashish Jaiswal
Sanjay Shirsat On Court Decision : आम्हाला अपेक्षित निर्णयच आला, आम्ही खूष आहोत..

...तर शिंदेपुढेही पेच

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्ण ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी प्रत्येक पाऊल अभ्यास करून टाकले. त्यानुसार निर्णय घेतले. दरम्यान ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण निर्णय घेतले असते तर आमचे ओपरेशन फेल झाले असते. शिंदे यांना गटनेता पदातून काढण्याचा निर्णय आमदारांनी बहुमतांनी घ्यायला हवा होता. मात्र तसे झाले नाही. जे निर्णय घ्यायला हवे होते त्याऐवजी चुकीच निर्णय घेतले. त्यांनी अभ्यासपूर्ण कायदेशीर निर्णय घेतले असते तर शिंदे गटापुढेही पेच निर्माण झाला असता. चुकीच्या सल्ल्यांमुळेच सर्व महाभारत घडल्याचेही आमदार जयस्वाल म्हणाले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com