यासाठीच तर गुजरातच्या सुरत आणि नंतर गुवाहाटीत जाऊन सत्ता स्थापन केली नाही ना ?

शिंदे सेना आणि भाजपच्या कार्यकाळात वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये पळवला. असे असताना हेच नेते महाविकास आघाडीवर दोष देत आहे, असेही लोंढे (Atul Londhe) म्हणाले.
Devendra Fadanvis, Atul Londhe and Eknath Shinde
Devendra Fadanvis, Atul Londhe and Eknath ShindeSarkarnama

नागपूर : महाविकास आघाडी सरकार पाडण्यास मदत केल्याने गुजरातला (Gujrat) फॉक्सकॉनचा प्रकल्प देऊन मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपकारांची परतफेड केली का, असा सवाल काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी उपस्थित केला. सुरत आणि गुवाहाटीमध्ये आश्रय घेऊन महाराष्ट्रात यासाठीच तर शिंदे-फडणवीसांनी सत्ता मिळवली नाही ना, असाही प्रश्‍न लोंढेंनी उपस्थित केला.

तुम्ही तुमच्या पक्षासोबत गद्दारी केली, ठीक आहे... आम्हाला त्याचे काही देणेघेणे नाही. पण वेदांता फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातला पाठवून महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी काँग्रेसतर्फे युवकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन उभे केले जाईल, असाही इशारा आज पत्रकार परिषदेत अतुल लोंढे यांनी दिला. शिंदे सेना आणि भाजपच्या कार्यकाळात वेदांताचा फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये पळवला. असे असताना हेच नेते महाविकास आघाडीवर दोष देत आहे, असेही लोंढे म्हणाले.

शिंदे सरकारची स्थापना झाल्यानंतर १५ जुलै २०२२ ला राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीची बैठक घेण्यात आली होती. याचा अर्थ जुलै महिन्यात हा प्रकल्प महाराष्ट्रातच होता. या बैठकीचे इतिवृत्तही लोंढे यांनी यावेळी सादर केले. त्यात वेदांताला दिल्या जाणाऱ्या सोयी सवलतींची व सुविधांची सविस्तर माहितीही दिली आहे. हे इतिवृत्त खोटे आहे का, असेही लोंढे यांनी विचारले. आता स्वतःची नामुष्की टाळण्यासाठी हा प्रकल्प गुजरातला स्थापन करण्याचे आधीच ठरले होते, असे दावे केले जात आहेत. वेदांताचे प्रमुख अग्रवाल यांच्यावर राजकीय दबाव असावा, यामुळेच ते आधीच ठरले होते, असे सांगत असावे, अशी शंका व्यक्त करून अतुल लोंढे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले.

Devendra Fadanvis, Atul Londhe and Eknath Shinde
Video: फडणवीस मुंबईच्या झगमगाटात हरवले...;अतुल लोंढे

वेदांताचा विषय राजकीय किंवा महाराष्ट्र-गुजरामधील स्पर्धेचा नाही. या प्रकल्पामुळे कोट्यवधींची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार आहे. लाखो नोकऱ्या येथील तरुणांना उपलब्ध झाल्या असत्या. प्रकल्पाचा फिजीबिलीटी रिपोर्ट हा संपूर्णतः महाराष्ट्रासाठी अनुकूल होता. त्यामुळेच हायपॉवर कमिटीची मीटिंग घेऊन सगळे निर्णय घेण्यात आले होते. त्यामुळेच ६० हजार कोटी रुपयांची कॅपिटल सबसिडी महाराष्ट्र देणार होते. अचानक असे काय झाले की हा प्रोजेक्ट महाराष्ट्रातून गेला, असेही लोंढे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in