चेरापुंजीतील ‘तो’ कथित व्हिडिओ व्हायरल; नाना पटोले-चित्रा वाघ यांच्यात जुंपली

हे भाजपचे कट कारस्थान असल्याचा आरोप नाना पाटोले (Nana Patole) यांचा आरोप
Nana Patole Controversial video
Nana Patole Controversial video Sarkarnama

भंडारा : मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करुन या व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले असल्याचे दावा केला आहे. "काय नाना… तुम्ही पण झाडी, डोंगार आणि हाटीलीतं असं म्हणतं त्यांनी पटोले यांना डिवचण्याचा प्रयत्न केला".

माझ्याकडे व्हिडीओ आल्यानंतर मलाही जरा आश्चर्याचा धक्का बसला. तो व्हिडीओ साध्या सुध्या माणसाचा नाही, तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आहे. त्यामुळेच मी थेट ट्विट करुन नानांना प्रश्न विचारला की, नाना हे काय आहे? मागच्या १० ते १२ दिवसांमध्ये काही ज्या काही गोष्टी समोर आल्या त्यात नाना पटोलेंचा व्हिडीओ धक्कादायक आहे. भाजपच्या नेत्याचा अशाप्रकारचा व्हिडीओ व्हायरल झाल्या झाल्या पक्षाने कारवाई केली, मात्र टीकेची धार कमी होताना दिसत नाही. तसेच हा व्हिडीओ जरी खासगी असला तरीही एखादी गोष्ट पब्लिकमध्ये आल्यानंतर ती खासगी राहत नाही, असे म्हणतं व्हिडीओ ट्विट केल्याचे समर्थन केले.

वाघ यांनी या प्रकरणात उडी घेतल्यानंतर कथित व्हिडीओमुळे पटोलेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, या व्हिडिओवरून नाना पटोलेंना नेटकऱ्यांनी आज चांगलेच ट्रोल केले. सर्वत्र त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठवली जात आहे. याबाबत नाना पटोलेंना विचारले असता त्यांनी हे भाजपचे (BJP) कारस्थान असल्याचा आरोप करत, त्या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेवून पटोले यांच्या आरोपांना उत्तर दिले.

Nana Patole Controversial video
नाना पटोले म्हणाले, महाशक्ती कुणाची हे आम्हाला कळाले

काय म्हणाले नाना पटोले?

आपल्याला बदनाम करण्याचा हा कट-कारस्थान आहे. याबाबत आमच्या तक्रारी करणे सुरु झाले असून, निश्चित कारवाई होईल. या सगळ्या प्रकरणावर आपली लीगल टीम उत्तर देईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com