‘त्या’ पत्राचा ५.२६ कोटी रुपयांच्या मंजुरीशी काही एक संबंध नाही...

त्यांच्या कोणत्याही पत्रामध्ये या रकमेचा उल्लेख नाही. पण पोस्टरबाजी करताना त्यांनी त्यामध्येही खोडतोड करण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार (MLA Sudhir Mungantiwar) यांनी केला आहे.
‘त्या’ पत्राचा ५.२६ कोटी रुपयांच्या मंजुरीशी काही एक संबंध नाही...
MLA Sudhir Mungantiwar on MLA Kishor Jorgewar's LetterSarkarnama

नागपूर : चंद्रपुरातील बाबूपेठ उड्डाण पुलासाठी शासनाने ५.२६ कोटी रुपये मंजूर केले आहे. हा पैसा आणला कुणी यावरून जिल्ह्यात राजकारण पेटले आहे. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार (MLA Kishor Jorgewar) यांनी हा निधी आपण आणला असल्याचा दावा केला आहे. पण त्यांचा हा दावा माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी खोडून काढला आहे.

याबाबत ‘सरकारनामा’शी बोलताना आमदार मुनगंटीवार (MlA Sudhir Mungantiwar) म्हणाले, २४ कोटी रुपये २०१८-१९ साली मी बजेटमध्ये दिले होते. यामधील १८ कोटी ७४ लाख रुपयांतून बाबूपेठमधील रस्ते आणि इतर विकास कामे केली. दरम्यान कार्यकारी अभियंत्यांनी मला सांगितले की, चंद्रपूर (Chandrapur) शहरातील बाबूपेठच्या उड्डाण पुलासाठी ५.२६ कोटी रुपये पाहिजे आणि मी केलेल्या पाहणीमध्येही आढळले की, इतर कामांपेक्षा हा रखडलेला पूल आधी करणे गरजेचे आहे. त्यामुळे नंतर मग बाबूपेठच्या रेल्वे उड्डाण पुलासाठी ५.२६ कोटी रुपये मिळावे, यासाठी नगर रचना विकास विभागाला पत्र दिले. त्यानंतर हा निधी मंजूर झाला. चंद्रपूरच्या आमदारांनी निधीसाठी पत्रव्यवहार केलाही असेल, पण ५.२६ कोटी रुपयांच्या मंजुरीशी त्यांच्या पत्रांचा काही एक संबंध नाही.

तसे पाहता प्रत्येकच आमदार आपल्या मतदार संघामध्ये कामे करण्यासाठी धडपड करत असतो. चंद्रपूरच्या आमदारांनीही शहरात कामे करण्यासाठी पत्रव्यवहार केला. पण त्यांच्या पत्रव्यवहाराचा आत्ता मंजूर झालेल्या ५.२६ कोटी रुपयांशी काहीही संबंध नाही. कारण त्यांच्या कोणत्याही पत्रामध्ये या रकमेचा उल्लेख नाही. पण पोस्टरबाजी करताना त्यांनी त्यामध्येही खोडतोड करण्याचा प्रकार केला असल्याचा आरोप आमदार मुनगंटीवार यांनी केला आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी नगरविकास विभागाचे मंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या पत्रात त्यांनी ‘चंद्रपूर येथील बाबूपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामाकरिता मंजूर निधीपैकी शिल्लक असलेला ६.७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा’, अशी मागणी केलेली आहे. ते पत्र ‘सरकारनामा’ला प्राप्त झाले आहे. ५.२६ कोटी हा आकडा कुठून आला, हे सुद्धा आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. ते म्हणाले २०१९ साली बजेटमध्ये २४ कोटी रुपये दिले होते, ते जिल्हाधिकाऱ्यांकडे डिपॉझीट होते. त्यांपैकी १८ कोटी ७४ लाख रुपये दुसरीकडे एका कामात वापरले होते आणि उरलेले ५.२६ कोटी आणखी एका कामात वापरणार होतो. पण बाबूपेठच्या उड्डाण पुलाचे काम अत्यावश्‍यक असल्याने त्या कामासाठी मी या रकमेची मागणी शासनाकडे केली होती आणि त्यानुसार ते मंजूर झाले. त्यामुळे हे ५.२६ कोटी रुपये आणल्याचे श्रेय इतर कुणी घेण्याचा प्रश्‍नच नाही, असेही आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

MLA Sudhir Mungantiwar on MLA Kishor Jorgewar's Letter
Video: देवेंद्र फडणवीसांची कुठेही बॅक डोर एंट्री नाही; सुधीर मुनगंटीवार

त्या २४ कोटींपैकी १८ कोटी ७४ लाख रुपये रस्त्याच्या कामांवर खर्च केल्यानंतर उरलेली रक्कम बाबूपेठच्या उड्डाण पुलाच्या कामासाठी द्यावी, अशी मागणी मी शासनाकडे केलेली आहे. पण या रकमेच्या मागणीची उल्लेख चंद्रपुरच्या आमदारांच्या एकाही पत्रात नाही. ६.७४ कोटी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे ही रक्कम आणल्याचा दावा ते करू शकत नाहीत, असे आमदार मुनगंटीवार ठामपणे म्हणाले. ५.२६ कोटी रुपयांची मागणी कोणत्या कोणत्या आमदारांनी केली आणि हा पैसा कोणत्या वर्षी मंजूर झाला होता, याची माहिती मी आता घेत आहो. ही माहिती आल्यावर ‘दूध का दूध अन् पानी का पानी’ होणार आहे, असेही आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in