ठाकरेंचे सैनिक खासदार गवळींवर धावून गेले, तर शिंदे सैनिकांनी जाळला राऊतांचा पुतळा...

शिवसेनेच्या महिला खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या मुंबईला जाण्यासाठी मंगळवारी अकोला रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. त्याच वेळी खासदार विनायक राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक रेल्वे स्थानकावर उपस्थित होते.
Bhavana Gawali
Bhavana GawaliSarkarnama

अकोला : खासदार भावना गवळी या रेल्वेने मुंबईला निघाल्या असताना खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत अकोला रेल्वे स्थानकावर शिवसेनेच्‍या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या दिशेने धावत जाऊन नारेबाजी केली होती. या अवमानाच्या निषेधार्थ बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी बस स्थानकाजवळील धिंग्रा चौकात खासदार विनायक राऊत यांचा पुतळा जाळून निषेध नोंदविला.

त्यानंतर महिला खासदारांच्या अंगावर धावून जाणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन पोलिस (Police) अधीक्षकांना देण्यात आले. या घटनेमुळे अकोल्यात (Akola) शिवसेना विरुद्ध शिवसेना (Shivsena) असा संघर्ष बघावयास मिळत आहे. शिवसेनेच्या महिला खासदार भावना गवळी (Bhavana Gawali) या मुंबईला जाण्यासाठी मंगळवारी अकोला रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. त्याच वेळी खासदार विनायक राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसैनिक रेल्वे स्थानकावर उपस्थित होते. त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांनी खासदार भावना यांच्या दिशेने धाव घेऊन व त्यांच्या अंगावर धावून जाऊन नारेबाजी केली.

रेल्वे बोगीच्या खिडकीवर लाथा बुक्क्या मारून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी वाघांची संघटना तयार केली होती. ती महिलांच्या रक्षणासाठी होती. त्यांचे नाव घेवून महिला खासदाराच्या अंगावर जाणाऱ्या खासदार विनायक राऊत व उपस्थितांचा निषेध म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खासदार राऊत यांचा पुतळा दहन केला. त्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह उपस्थित सर्वांवर गुन्हे दाखल करण्याबाबत तक्रार देण्यात आली.

Bhavana Gawali
Bacchu Kadu : आमदार बच्चू कडूंचा ‘अकोला पॅटर्न’ देशासाठी ठरणार दिशादर्शक...

यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा अकोला जिल्ह्याचे संपर्क प्रमुख गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाप्रमुख अश्विन नवले, विठ्ठल सरप, निवासी उपजिल्हाप्रमुख योगेश बुंदेले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे, माजी नगरसेविका सपना नवले, शहर प्रमुख पश्चिम मुरलीधर सटाले, उपजिल्हाप्रमुख ललित वानखडे, तालुकाप्रमुख दीपक दांदळे, डॉ. राजेश अग्रवाल, युवा सेना जिल्हाप्रमुख निखिल ठाकूर, नितीन मानकर, शहर प्रमुख विक्कीसिंग बावरी, अतुल येळणे, शिवा अडवाणी, महिला आघाडीच्या राजेश्वरी अम्मा शर्मा, उपशहर प्रमुख गणेश गोगे यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in