ऊर्जामंत्र्यांची अडचण ठाकरे, पवार समजून घेतील, विश्‍वजित कदमांना विश्‍वास...

ऊर्जामंत्र्यांची (Nitin Raut) अडचण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) नक्कीच समजून घेतील, असा विश्‍वास त्यांनी (Vishwajeet Kadam) व्यक्त केला.
Vishwajeet Kadam, Nitin Raut, Uddhav Thackeray and Ajit Pawar.
Vishwajeet Kadam, Nitin Raut, Uddhav Thackeray and Ajit Pawar.Sarkarnama

भंडारा : राज्यात विजेचा तुटवडा होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी आपल्या सहकारी पक्षांवर आरोप केले आहेत. भंडाऱ्याचे पालकमंत्री विश्वजित कदम येथे (Vishwajeet Kadam) आले असताना, त्यांना या याबाबत विचारले असता, ऊर्जामंत्र्यांची अडचण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) नक्कीच समजून घेतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

कोविडमुळे राज्य सरकारवर आलेली आर्थिक परिस्थिती सर्व ज्येष्ठ नेत्यांना माहीत आहे. शिवाय केंद्रातून GST चे पैसेही येणे बाकी आहेत. ती रक्कम मिळाल्यास आम्ही बाकी आर्थिक प्रश्न सोडवू शकतो, असे ही ते म्हणाले. यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथे एका कार्यक्रमात डॉ. हेडगेवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत विचारले असता, ते वणीत काय बोलले, याची मला माहिती नाही, अशी कबुली त्यांनी दिली. त्याची माहिती घेऊन नंतर आपल्याशी बोलेन, असे विश्‍वजित कदम यांनी सांगितले.

आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गावगुंड मोदीबद्दल जे वक्तव्य केले, त्याचा खुलासाही केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, भंडारा जिल्ह्यात निवडणुकीच्या दरम्यान गावकऱ्यांनी मोदी नामक गावगुंडाबाबत तक्रारी केल्या होत्या. मोदी हे त्या गुंडाचे टोपण नाव आहे. त्यामुळे त्यांची जीभ घसरण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. कारण त्यांनी केलेल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे माझ्या लेखी हा विषय संपलेला आहे आणि आता हा विषय जास्त चघळण्यात अर्थ नाही, असे विश्‍वजित कदम यांनी सांगितले.

नाना पटोले ह्यांच्या मोदींबद्दलच्या वक्तव्यावरून राज्यभर वाद पेटला असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी डॉ. हेडगेवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या भाजपकडून निषेध केला जात आहे. या परिस्थितीत पालकमंत्री विश्वजित कदम यांनी दोघांचीही बाजू सावरून घेतली आहे. महावितरणवर 40 हजार कोटी रुपयांचे कर्ज असल्याने रिकव्हरी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. कोरोनाची अडचण पाहुन त्या काळात वीज कापली जात नव्हती. मात्र आता रिकवरीसाठी विभाग आपली कारवाई करत असल्याने भंडारा जिल्ह्यात कृषी पंपांची विज कापली जात आसल्याचेही ते म्हणाले.

Vishwajeet Kadam, Nitin Raut, Uddhav Thackeray and Ajit Pawar.
Video: राज्य अंधारात गेलं तर...केवळ काँग्रेस जबाबदार नसेल, मविआ जबाबदार असेल, नितीन राऊत

सर्व पक्षांला समान निधि वाटप व्हावा, हे सर्वांनाच वाटत असते. अर्थमंत्री अजित पवार हे फक्त त्यांच्या पक्षाच्या मंत्राला मुबलक निधि देतात आणि महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षांच्या मंत्र्यांना निधि देताना मात्र हात आखडता घेतात. याबाबत विचारणा केली असता, हे सर्व निर्णय तीन पक्षांची समन्वय समिती घेत असते. किमान समान कार्यक्रमानुसार कामकाज सुरू असल्याचे विश्‍वजित कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com