Nitin Deshmukh News: ठाकरे गटाचे आमदार देशमुख थेट कपड्याची बॅग भरूनच एसीबीच्या दारात

Nitin Deshmukh : बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी एसीबीने त्यांना नोटीस पाठवली होती
Nitin Deshmukh
Nitin Deshmukh Sarkarnama

Amravati News: ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे आज अमरावती एसीबीच्या विभागीय कार्यालयात चौकशीसाठी अकोल्यातून रवाना झाले. यावेळी देशमुख यांच्या पत्नीने त्यांचं औक्षण केलं. तसेच आपल्याला अचानक अटक झाल्यास गैरसोय होऊ नये, म्हणून त्यांनी आपल्या कपड्यांची बॅग भरुन बरोबर नेली आहे. त्यामुळे त्यांची राज्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

नितीन देशमुख यांना त्यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी १७ जानेवारीला एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर ते एसीबीच्या कार्यालयात हजर होणार आहेत.

नितीन देशमुख (Nitin Deshmukh) हे अकोल्यातून अमरावतीकडे निघाले असून त्यांनी यावेळी मोठं शक्तीप्रदर्शन केलं. तसेच त्यांच्याबरोबर जवळपास 700 कार्यकर्ते अमरावतीला निघाले असल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

Nitin Deshmukh
Charan Waghmare यांना उच्च न्यायालयाचा दणका, उपाध्यक्षांवर अपात्रतेची टांगती तलवार..

नितीन देशमुख हे अकोला (Akola) जिल्ह्याच्या बाळापूर मतदार संघाचे आमदार आहेत. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, ''आपल्याला एसीबी (ACP) कार्यालयात हजर झाल्यानंतर अटक करू शकतात. त्या हिशोबाने तयारीलाच लागलोय. म्हणूनच घरून जातानीच सोबत कपडे घेऊन चाललो आहे. हे सरकार हुकूमशाही पद्धतीने चालू आहे. इंग्रजापेक्षाही जास्त हे खराब लोकं आहेत'', असा आरोपही यावेळी देशमुखांनी केला.

Nitin Deshmukh
Shivsena News : निवडणूक आयोगात शिंदेंनी टाकलेला डाव ठाकरेगट उलटवणार; या मुद्यांवर घेरणार?

दरम्यान, याआधी देशमुख यांनी ही नोटीस आल्यानंतर आपल्याविरुद्ध हे षडयंत्र असल्याचा आरोप केला होता. तसेच आपल्याकडे तक्रार करणाऱ्याची आणि शिंदे यांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in