Akola News: ठाकरे गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल: वाचा, काय आहे प्रकरण?

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत हे आमदारही त्यांच्यासोबत सुरतला पळून गेले होते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Akola Politics : शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपुरात सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी (२७ डिसेंबर) अकोल्यात ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती. रवी भवनात ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पास देण्यात आले होते. ज्यांच्यकडे पास नव्हते त्यांना पोलीसांनी गेटवरच अडवले. त्यामुळे आमदार नितीन देशमुख यांनी गेटवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी वाद घातला. यावेळी पोलीस आणि देशमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली. आमदार देशमुख पोलिसांना धक्काबुक्की करुन आपल्या पदाधिकाऱ्यांना आतमध्ये घेऊन गेले.

Uddhav Thackeray
Maharashtra Congress : गटातटाच्या राजकारणाला मूठमाती दिली तरच महाराष्ट्रात काँग्रेसला भवितव्य !

या सर्व घटनेची चौकशी केल्यानंतर आणि रवी भवनातील सीसीटिव्ही फुटेज पाहिल्यानंतर रात्री उशीरा देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यावरुन आता वरिष्ठ पातळीवरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोण आहेत नितीन देशमुख?

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी दरम्यान, सुरतला पळून जाताना बाळापूरचे आमदार नितीन देशमुखही त्यांच्या सोबत होते. पण ते दोन दिवसातच मुंबईला पळुन आले. त्यानंतर आपल्याल फसवून, आपल्या मनाविरुद्ध आपल्याला सुरतला पळवून नेण्यात आल्याचा आरोप त्यांनी शिंदे गटावर केला होता.

मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून पळून आलो. कोणते वाहन भेटते का ते बघत होतो. वाहने येत जात होती, पण एकाही वाहनधारकाने मला घेतले नाही. माझ्या मागावर १०० ते १५० पोलिस होते. त्यांनी जबरदस्तीने तेथून उचलून मला हॉस्पिटलमध्ये नेले, असे आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केले होते. मला हृदयविकाराचा झटका आलेला नव्हता. मी आजारी नव्हतो. मला बळजबरीने डाव्या दंडावर इंजेक्शन टोचण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com